विठ्ठलवाडीतील भीमा नदीवरील पूल अखेर पाण्याखाली

शिरूर तालुका

शिरुर व दौंड तालुक्याचा संपर्क तुटण्याचे शिरूर तालुका डॉट कॉमचे भाकीत अखेर खरे

शिक्रापूर: विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भीमा नदीच्या पुलावरुन प्रत्येक वर्षी पाणी वाहत होत असल्याने शेजारील तालुक्यांचा संपर्क तुटत असतो. सध्या येथील भीमा नदीला पूर आल्याने भीमा नदी तुडुंब वाहत असताना असल्याने शिरुर व दौंड तालुक्याचा संपर्क तुटण्याची चिन्हे दिसू लागल्याबाबतची बातमी “शिरुर तालुका डॉट कॉम” ने प्रसिद्ध केली होती अखेर सदर भाकीत खरे ठरले असून विठ्ठलवाडी येथील भीमा नदीला पूल पाण्याखाली जाऊन शिरुर व दौंड तालुक्याचा संपर्क तुटला आहे.

विठ्ठलवाडी (ता. शिरुर) हे शिरुर व दौड तालुक्याच्या सीमेवरील गाव असून येथील भीमा नदीच्या पुलावरुन दोन्ही तालुक्यांचा संपर्क होत असतो तर शेजारीच हवेली तालुक्याला सदर पुलावरुन वाहतूक होत असते. सध्या सुरु असलेल्या मुसळधार व संततधार पावसामुळे येथील भीमा नदीला पूर आल्याने नदीचे पाणी विठ्ठलवाडीच्या पुलाला टेकत होते. पाण्याची पातळी वाढल्याने येथील शेतकऱ्यांनी सर्व विद्युत मोटार पाण्याच्या बाहेर काढून घेतल्या. सध्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढत असताना पाणी पुलाला टेकत आहे.

unique international school
unique international school

परंतु पावसाचा जोर जास्त वाढल्यास तसेच पाणी पातळी वाढल्यास पाणी पुलावरून वाहत जाणार असल्याचे बोलले जात असताना याबाबत आम्ही बातमी “शिरुर तालुका डॉट कॉम” ने प्रसिद्ध केली अखेर आज पहाटेच्या सुमारास नदीचे पाणी वाढल्याने पाणी पुलावरून वाहू लागल्याने संपर्ण पूल पाण्याखाली गेला असून येथील शिरुर, हवेली व दौंड तालुक्यातील सर्व नागरिकांचा संपर्क तुटला असल्याने अनेक शेतकरी, कामगार, दुग्ध व्यावसायिक तसेच शालेय मुलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. मात्र दिवसभर येथील नागरिकांनी सदर पुलावरुन होणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली आहे.