बातमीचा दणका पोलिसांनी केली ‘त्या’ वाहनावर तातडीने कारवाई

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती: रांजणगाव MIDC मध्ये काही कंपन्यांमधील कचरा गोळा करुन तो रस्त्यावरुन धोकादायकरीत्या वाहतुक करण्यात येत असुन दुर्गंधीयुक्त कचरा रस्त्यावर सांडत असल्याने इतर वाहनचालकांना त्याचा विनाकारण त्रास होत असल्याची बातमी “शिरुर तालुका डॉट कॉम” ने प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत रांजणगाव पोलिसांनी तातडीने या वाहनांवर कारवाई केली आहे.

unique international school
unique international school

कारेगाव येथील यश इन चौकातुनच काही दिवसांपूर्वी धोकादायक कचरा वाहतुक करणारा टेम्पो MIDC मध्ये आणुन त्याची विल्हेवाट लावली जात होती. याबाबत बातमी प्रसिद्ध झाल्यावर रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी तातडीने वाहतुक विभागाचे पोलीस नाईक राजेंद्र वाघमोडे तसेच पोलीस अंमलदार सूरज वळेकर यांनी सदर वाहनांवर कारवाई करुन सदर टेम्पो चालकाविरुद्ध टेम्पोची कागदपत्रे जवळ नसताना तसेच टेम्पोला नंबर नसताना रहदारीस अडथळा होईल अश्या पद्धतीने वाहन चालविल्याबद्दल भा. द. वि. कलम २८३ प्रमाणे गुन्हा दाखल करत हे वाहन जप्त केले आहे.