माजी महिला सरपंचाच्या दुर्देवी मृत्यूने गावात हळहळ…

महाराष्ट्र

मंचर: आंबेगाव तालुक्यातील जवळी गावात कौलारू छप्पर अंगावर कोसळल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. रंगुबाई धोंडीभाऊ काळे (वय 46) असे मृत्यू झालेल्या महिलेची नाव आहे. रंगुबाई काळे या जवळी गावच्या माजी सरपंच होत्या.

पुणे जिल्ह्यात सध्या सर्वदूर जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसातच ही घटना घडली. रंगुबाई काळे या ठाकर समाजाच्या माजी महिला सरपंच होत्या. जवळी गावातील लायगुडे मळा येथे त्या राहत होत्या. सोमवारी दुपारी त्या घराशेजारीच असणाऱ्या कौलारू शेडमध्ये गेल्या असता अचानक हे छप्पर त्यांच्या अंगावर कोसळले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

उपचारासाठी त्यांना तातडीने मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने जवळे गावात हळहळ व्यक्त केली जाते.

unique international school
unique international school