पाबळ (सुनिल जिते) मलठण (ता. शिरुर) येथील बंद दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानी अंदाजे ४६ हजार रुपये किंमतीच्या सामानाची चोरी केल्याची घटना (दि २) रोजी मध्यरात्री घडली असुन याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी निलेश गुलाब दंडवते (रा.मलठण, ता. शिरुर जि.पुणे ) यांनी शिरुर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. दंडवते यांचे मलठण येथे किराणा दुकान असुन त्याच्यावर ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.
सध्या पावसाळा चालु असल्याने दंडवते यांनी मलठण येथील श्रावणी मार्बल अँड टाईल्स या दुकानात किराणा दुकानातील गहू, हरभरा, हुलगा, बाजरी, मका, तुर असा काही माल ठेवला होता. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचा पत्रा व शेडचे कुलूप तोडून एकूण ४६ हजार किमतीचे धान्य व इतर माल लंपास केला आहे. शिरुरचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उमेश भगत या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
शिरुर येथील सुरेश पाचर्णे यांची पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरास दिली १ लाख १ हजार १११ रुपयांची देणगी
शिरुरच्या पश्चिम भागातील कवठे येमाई, मलठण परिसरात एका रात्रीत फोडली पाच घरे
शिरुर तालुक्यात विद्युत रोहीत्रांच्या चोऱ्या थांबेना, शेतकरी हतबल ;पोलिसांपुढे मोठे आव्हान