कान्हूर मेसाईच्या विद्यालयात शिवमेघडंबरीचे अनावरण

शिरूर तालुका

शिवजयंतीच्या मुहूर्तावर भक्तीशक्ती शिल्पाचे देखील उदघाटन

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई ता. शिरुर येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिवजयंतीच्या मुहूर्तावर शिवमेघडंबरी व भक्तीशक्ती शिल्पाचे अनावरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले असून कान्हूरचे विद्यालय हे विद्यालयात शिवमेघडंबरी व भक्तीशक्ती शिल्प उभारणारे पुणे जिल्ह्यातील विद्यालय ठरले आहे.

कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अनिल शिंदे यांच्या संकल्पनेतून शिवजयंतीच्या मुहूर्तावर शिवमेघडंबरी व भक्तीशक्ती शिल्पासाठी कान्हूर मेसाईचे उद्योजक रोहिदास ढगे, राष्ट्रीय खेळाडू सागर दंडवते, उद्योजक संतोष उकिर्डे यांनी चार लाख रुपये निधी दिला असून विद्यालयात शिवमेघडंबरी व भक्तीशक्ती शिल्प उभारणारे पुणे जिल्ह्यातील कान्हूर मेसाईचे विद्याधाम हे एकमेव विद्यालय आहे. शिवजयंतीच्या मुहर्तावर अर्चना ढगे, रोहिदास ढगे, नाजूका दंडवते, सागर दंडवते, स्नेहउकिर्डे, संतोष उकिर्डे यांच्या शुभहस्ते सदर अनावरण सोहळा पार पडला. शिवनेरी हून शिवज्योत आल्यानंतर मेसाई मंदिरात शिवज्योतीचे विद्यालयाच्या झांज पथकाने विद्यार्थ्यांनी स्वागत केले.

दरम्यान सरपंच चंद्रभागा खर्डे यांनी शिवपूजन केले, यावेळी शिवज्योत विद्यालयात आल्यानंतर शिवमेघडंबरी व भक्तीशक्ती शिल्पाचे अनावरण करण्यात आले. यावेळी मंत्रालय कक्ष अधिकारी अजय खर्डे, सरपंच चंद्रभागा खर्डे, उपसरपंच सोपान मिडगुले, ग्रामपंचायत सदस्य विजय घोलप, दिपक पुंडे, योगेश पुंडे, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष गंगाधर पुंडे, सचिव सुदाम तळोले, संचालक सदाशिव पुंडे, बाबुराव दळवी, शहाजी दळवी, खैरवाडीचे उपसरपंच नंदकुमार गोडसे, उद्योजक सूर्यकांत निटूरे, अमोल पुंडे, दिपक तळोले, रामदास कुलट, विश्वनाथ नाणेकर, अशोक उकिर्डे, वर्षा करंजकर, मारुती थोपटे, दिलीप नाणेकर, अनिल साकोरे, अजित गोरडे, ॲड. गणेश पुंडे, धर्माजी लंघे, दादा बोऱ्हाडे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी दहावीच्या १९९४ ते १९९५ व २००४ ते २००५ च्या तुकडीने विद्यालयातील सांस्कृतिक रंगमंचाच्या नूतनीकरणासाठी 1 लाख 1 हजार रुपयांची मदत संस्थेचे अध्यक्ष गंगाधर पुंडे, सचिव सुदाम तळोले व प्राचार्य अनिल शिंदे यांच्याकडे सुपूर्द केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश चव्हाण यांनी केले तर प्रास्ताविक प्राचार्य अनिल शिंदे यांनी केले आणि विनोद शिंदे यांनी आभार मानले.