शिरुर नगरपरिषदेच्या हद्दीतील पदपथावरील विजेच्या खांबातून होतेय वीज चोरी

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे )शिरुर नगरपरिषद हद्दीतील गोलेगाव रस्त्यावरील ‘सुंदर सृष्टी’ या गृहप्रकल्पामधील बिल्डरने अनाधिकृतपणे गैरमार्गाने नगरपरिषदेच्या पथदिव्यांच्या खांबातून बांधकाम करण्यासाठी वीज कनेक्शन घेऊन वीजचोरी केल्याचे निदर्शनात आले आहे. या वीजेचा वापर सुंदर सृष्टी मध्ये चालु असलेल्या बांधकामाला केला आहे. सन २०१९ पासुन हा वीज चोरीचा प्रकार सुरु असल्याचे समजते.

 

शिरुर नगरपरिषद नागरिकांच्या करातून पथ दिव्यांचे वीज बील भरत आहे. या बांधकामधारकाने चुकीचा वीज वापर केल्याने त्याच्यावर तात्काळ चौकशी करुन वीजचोरीचा खटला (गुन्हा) दाखल करण्यात यावा. २०१९ पासुनची पथदिव्यांची वीजबिल या बांधकाम धारकांकडून वसूल करण्यात यावी असे मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, शिरुर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे माजी शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनसेचे जनहित शहराध्यक्ष रवी लेंडे यांनी लेखी पत्राद्वारे शिरुर नगरपरिषदेकडे याबाबत तक्रार केली आहे.