शिरुर नगरपरिषद हद्दीत अनाधिकृत जीओचे पोल काढण्याचे तात्काळ आदेश द्यावे अन्यथा…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरात फायबर प्रा.लि, या कंपनीला पोल उभारण्याची परवानगी दिलेली आहे. परंतु सदर कंपनीने नगरपरिषदेने घालून दिलेल्या अटी व शर्थीचा भंग केला आहे.

शिरूर नगरपरिषद हद्दीतील ‘शिवसेवा’ मंडळाच्या गाळ्यांसमोर सिमेंटच्या रस्त्यावरच बेकायदा पोल बसवण्यासाठी ब्रेकरच्या साहय्याने आत्ताच नव्याने करण्यात आलेला सिमेंटचा रस्ता खोदून पोल उभे केलेले आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या साईट पट्यावर पोल उभे केलेले आहेत. या सर्व गोष्टी जाणीवपूर्वक नगरपरिषद या सर्व गोष्टीवर मुद्दाम डोळेझाक करत आहे, असा आरोप मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद यांनी केला आहे. तसेच रस्त्याच्या सामासिक अंतरामध्ये जीओचे पोल उभारल्यामुळे शहरामध्ये अपघात होऊ शकतो, असे पञ जिल्हाधिकारी, पुणे याना दिले आहे.

नगरपरिषदेने जीओ कंपनीला अटी व शर्थी घालून दिल्या होत्या पण त्या अटी व शर्थीचा भंग केला आहे. यामुळे नगरपरिषदेने उभारण्यात आलेल्या जीओ चे पोल काढण्याचे तात्काळ आदेश द्यावे, नाही तर या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहे, असे मनसेचे उपाध्यक्ष महिबुब सय्यद, शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे मा. शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनसेचे जनहित शहराध्यक्ष रवी लेंडे यांनी सांगितले आहे.