युवतींनी सायबर गुन्ह्यापासून सावध रहावे; ज्योती आहेरकर

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): सध्याची पिढी मोबाईलच्या आहारी चाललेली असताना मोबाईल मध्ये नवनवीन ॲप युवक वर्ग वापरत असून त्यातून असंख्य सायबर गुन्हे घडत असताना त्यामध्ये अनेक युवती देखील सायबर गुन्ह्याचे बळी ठरत आहेत. मात्र आहेत. मात्र युवतींनी सायबर गुन्ह्यापासून सावध रहावे, असे आवाहन पोलीस नाईक ज्योती आहेरकर यांनी केले आहे.

वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय येथे पोलीस विभागाच्या निर्भया पथकांतर्गत युवतींना मार्गदर्शन करताना पोलीस नाईक ज्योती आहेरकर बोलत होत्या. यावेळी महिला पोलीस नाईक अपेक्षा टावरे, मुख्याध्यापक एकनाथ चव्हाण, ज्येष्ठ शिक्षक विलास कुरकुटे, सोमनाथ भंडारे, हरिष शिंदे, मंगल मोकाशी यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना मोबाईलच्या विळख्यात अडकलेले युवक युवती अनेकदा सायबर गुन्ह्यांच्या शिकार बनत असून त्यांची फसवणूक होत आहे. मोबाईल वापरत असताना त्यातील अनावश्यक ॲप्स तसेच जाहिरात यावर मुला मुलींनी लक्ष घालू नये, तर आपले आनंदी जीवण हे जास्त आनंदी कसे होईल यासाठी लक्ष द्यावे तसेच प्रत्येकाने विद्यार्थी जीवनात अभ्यास शिस्त याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

परंतु आजची तरुण पिढी वाईट वर्तनाकडे झुकलेली आहे वेळीच सुधारणे गरजेचे आहे असे देखील पोलीस नाईक ज्योती आहेरकर यांनी सांगितले, तर पोलीस नाईक अपेक्षा टावरे यांनी देखील मुलींच्या अनेक प्रश्नांना योग्य उत्तरे देत मुलींच्या मनातील अनेक शंका समस्या यांचे समाधान केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ भंडारे यांनी केले तर मुख्याध्यापक एकनाथ चव्हाण यी आभार मानले.