शिरुर मध्ये संवादिनीच्या वतीने जागतिक पुस्तक दिन साजरा

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर:- एक मंदिर बांधले म्हणजे एक हजार भिकारी तयार करणे आणि एक ग्रंथालय बांधणे म्हणजे लाखो विद्वान निर्माण करणे होय. जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या. भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसे जगायचे ते शिकवेल असे भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे असे प्रतिपादन डॉ स्मिता बोरा यांनी व्यक्त केले.

शिरुर संवादिनीच्या वतीने शिरुर येथे (दि 23) जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला यावेळी डॉ बोरा बोलत होत्या. शिरुर संवादिनी हा पुणे ज्ञानप्रबोधिनी चा उपक्रम असून आज जागतीक पुस्तक दिनानिमित्त पुस्तकं जत्रा या विषयावर मासिक बैठक घेण्यात आली. 23 एप्रिल हा दरवर्षी दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो.२३ एप्रिल ह्याच तारखेला विल्यम शेक्सपियर,मेनयुअल मेजिया वलिजो यांचा जन्म देखील झाला होता. असे म्हटले जाते की अनेक दिग्गज लेखक साहित्यिक यांचा जन्म तसेच मृत्यु 23 एप्रिल रोजी झाला होता. त्यामुळेच 23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो.

यावेळी रोहिणी जावळे यांनी नाट्य छटा सादर केली. वाचनाच्या पद्धती आणि वाचनाचे महत्व या विषयावर चर्चा झाली आणि वेगाने कसे वाचायचे याच्या काही युक्त्या डॉ. सोनाली हार्दे यांनी सांगीतले. यावेळी कार्यक्रमाला रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले, पत्रकार किरण पिंगळे, डॉ मनीषा चोरे तसेच शिरुर मधील अनेक महिला आणि मान्यवर उपस्थित होते. डॉ. विद्या शिंदे यांनी प्रास्ताविक केले, तर उषा वाखारे यांनी आभार मानले.