पंचायत समितीतील विनापरवाना वृक्षतोडी विरोधात कधी होणार कारवाई?

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): एकीकडे शासण कोटयावधी रुपये खर्चुन झाडे लावा, झाडे जगवा अशी योजना निसर्गाचा समतोल राखण्यासाठी अनेक वर्षापासून प्रभावीपणे राबवत असताना शिरुरच्या पंचायत समिती मध्ये चक्क मध्यरात्री झांडाची जबाबदार अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विनापरवाना कत्तल करण्यात आली आहे. त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचर्णे यांनी केली आहे.

शिरूर पंचायत समितीच्या सुशोभिकरणा साठी प्रभारी गटविकास आधिकारी यांनी ग्रामपंचायतीचा विकास निधी मोठ्या प्रमाणावर सुशोभिकरणासाठी वापरल्याचा आरोप शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) अविनाश घोगरे, सुनिल जाधव यांनी केला आहे.त्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींना विकासनिधी मिळाला नाही. यासाठी वरीष्ठांची परवानगी घेतली का?याची चौकशी होणे गरजेच असल्याचे घोगरे यांनी सांगितले आहे

या आधिकाऱ्याला राजकिय पुढाऱ्यांचे पाठबळ मिळत असल्याची चर्चा होत असून वृक्षतोड प्रकरणी शिरूर नगर परीषद पंचनामा करूनही पुढील कार्यवाही का करत नाही. पुढील कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा नाथाभाऊ पाचर्णे यांनी दिला आहे. या विषयी शिरूर नगरपरीषदेचे मुख्याधिकारी प्रसाद बोरकर यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.