सावित्रीबाईंचा अपमान करणाऱ्यांना मुसक्या बांधून आणले पाहिजे; बाळासाहेब थोरात

मुंबई: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरती अत्यंत चुकीचे लिखाण करणारा अजूनही मोकाट आहे. सरकारने असे विकृत लिखाण करणाऱ्या गुन्हेगाराला मुसक्या बांधून आणले पाहिजे आणि रस्त्यावरून फिरवले पाहिजे, सरकार हे कधी करणार आहे? असा संतापजनक सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात उपस्थित केला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल विकृत लिखाण करणाऱ्या गुन्हेगाराच्या संदर्भांने आज सभागृहात […]

अधिक वाचा..

इंस्टाग्रामवर कोयत्याचे प्रदर्शन करुन दहशत करणे पडले महागात; शिरुर पोलिसांनी दोघांना केले गजाआड

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात एका गावातील दोन युवकांनी बेकायदेशीर तसेच विनापरवाना कोयता जवळ बाळगून मंदिरामध्ये जावुन त्याची पुजा करुन सदर पुजेचा व्हिडीओ बनवुन तो व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून सोशल मीडियावरुन गावामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करत केला. शिरुर पोलिसांना खबऱ्यामार्फत याची माहिती मिळताच त्यांनी 1) रोहित महादेव हरिहर (वय 28) आणि 2) सिध्देश […]

अधिक वाचा..

दरोडा टाकुन जबरी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या म्होरक्यास अटक

१८ गुन्हे उघडकीस २९४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत शिरुर (तेजस फडके): मागील काही महीन्यांपासून पुणे ग्रामीण आणि अहमदनगर जिल्हयातील दुर्गम भाग तसेच रानातील एकांटी वस्तीमध्ये दरोड्यांचे व जबरी चोरीचे आणि घरफोडी चोरींचे प्रमाण वाढलेले होते. त्यामुळे सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी स्थानिक गुन्हे […]

अधिक वाचा..

दोन नराधामांचा नववीतल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद…

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात संतापजनक घटना समोर आली असून अल्पवयीन मुलीवर मागील ६ महिन्यांपासून लैंगिक अत्याचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन कन्नड शहर पोलीस ठाण्या तदोन आरोपीविरुद्ध 26 जून रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामेश्वर कवडे आणि मोहन शिंदे अशी आरोपींचे नावं असून, […]

अधिक वाचा..

पोलिसांनी उधळला तब्बल ११० कोटींचा ऑनलाइन दरोड्याचा डाव; सहा जणांना अटक

उपसरपंच-किराणा चालकासह ६ जणाला अटक? संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या सायबर क्राईमच्या टीमने मोठी कारवाई करत, तब्बल ११० कोटींचा ऑनलाईन दरोड्याचा प्रयत्न उधळून लावला असून मुंबईतील हिरे विक्री करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय कंपनीचे बँक ऑफ इंडियात असलेले खाते हॅक करून ११० कोटी रुपये परस्पर वळते करायचे आणि त्यातून क्रिप्टो करन्सी खरेदी करण्याचा कट रचणाऱ्या एका रॅकेटचा […]

अधिक वाचा..

पुणे ग्रामीण पोलीसांनी वेल्हे येथील दर्शना पवार खून प्रकरणाचा केला उलगडा; आरोपी जेरबंद

शिरुर (तेजस फडके): वेल्हे पोलीस स्टेशन हद्दीतील गुंजवणे गावच्या हद्दीत सतीचा माळ या ठिकाणी दि 18 जुन 2023 रोजी दर्शना पवार हिचा मृतदेह आढळून आला होता. हा गुन्हा घडल्यापासून यातील संशयित सुधीर ऊर्फ राहुल दत्तात्रय हंडोरे, पळून गेला असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन पोलिस तपास पथकांनी संशयीत राहुल दत्तात्रय हांडोरे याचा शोध घेऊन त्याला मुंबई, अंधेरी […]

अधिक वाचा..

वाघोली तलाठी कार्यालयातील दोन खाजगी व्यक्तींवर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून केली अटक

वाघोली: वाघोली येथील एका व्यक्तीने पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या जागेची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. त्यावर तलाठी कार्यालयातील मदतनीस आणि एका अन्य व्यक्तीने तलाठी यांच्याकडून काम करुन देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी वाघोली येथील तलाठी कार्यालयातील दोन खाजगी मदतनीसांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमात कुलूप तोडून पैसे चोरणारा अटक

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे एका बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील पस्तीस हजार रुपये चोरणाऱ्या चोरट्याला शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले असून मनोज उर्फ मन्या उर्फ अर्जुन राजेंद्र भंडारे असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील चंद्रकांत कुंभार हे 25 फेब्रुवारी २०२३ रोजी बाहेर गेलेले असताना अज्ञात […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातुन तब्बल पाच किलो गांजा जप्त करत कारसह एक जण ताब्यात…

शिक्रापूर पोलिसांची कारवाई शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील न्हावरा रस्त्याचे कडेला गांजा घेऊन आलेल्या कारवर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली असून सदर कारवाईत पाच किलो गांजासह कार जप्त करत रमेश लक्ष्मण पिंगळे व राहुल दौंडकर या दोघांवर गुन्हे दाखल केले मात्र राहुल दौंडकर हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. निमगाव […]

अधिक वाचा..

ग्रामीण पोलीस अधिक्षकांनी शेतीपंप चोरी करणारे केले तडीपार

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशन हददीमध्ये सन २०२२ या कालावधीमध्ये टाकळीहाजी, रावडेवाडी, आमदाबाद व बेट भाग तसेच गोलेगाव, इनामगाव या परीसरासह शिरूर तालुक्यातुन विद्युत शेतीपंपांची (पाणी उपसा मोटारींची) मोठया प्रमाणावर चोऱ्या झाल्या होत्या. त्याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात इलेक्ट्रीक मोटार चोरीचे ९ गुन्हे दाखल झाले होते. इलेक्ट्रीक मोटार चोरी करणारे चोरांचा शोध घेण्याकरता शिरूर पोलीस […]

अधिक वाचा..