शिरुर पोलिसांनी बाबूरावनगर येथील गांजा विक्रेत्या महिलेवर कारवाई करत केला गुन्हा दाखल 

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके): शिरुर येथे एका गांजा विक्री करणाऱ्या महिलेवर कारवाई करुन तिच्याकडुन 42 हजार 500 रुपयांचा सुमारे 4 किलो 250 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असुन याबाबत शिरुर पोलिस स्टेशनचे पोलीस अंमलदार रघुनाथ भिमराव हाळनोर यांनी फिर्याद दिली असुन प्रतिभा रमेश काळे (वय 45) रा. फलॅट नं. 2, सिध्दीविनायक कॉम्प्लेक्स, बाबुरावनगर, शिरुर, (ता. शिरुर), जि. पुणे या महिलेस अटक करण्यात आले आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि 7) रोजी रात्री 12:15 च्या सुमारास शिरुर शहरातील बाबुरावनगर येथील सिध्दीविनायक कॉम्प्लेक्स मधील फलॅट नं. 2 मध्ये प्रतिभा काळे या महिलेने हिने तिच्या घरात बेकायदेशीरपणे 4 किलो 250 ग्रॅम वजनाचा 42 हजार 500 रुपयांचा गांजा विक्रीसाठी जवळ बाळगला असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना मिळाली.

त्यांनी तात्काळ पोलीस पथक नेमून आरोपी प्रतिभा काळे हिच्या घरी छापा टाकून पंचासमक्ष गांजा जप्त करत कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, रघुनाथ हाळनोर, महिला पोलीस अंमलदार प्रतिभा देशमुख यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे. पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील हे करत आहेत.