रांजणगाव MIDC तील पी व्ही सन्स कंपनीच्या कामगारांचे 98 व्या दिवशीही आंदोलन सुरुच

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील पी व्ही सन्स या कंपनीतील कामगार पगारवाढ आणि निलंबीत केलेल्या कामगारांना परत कामावर रुजू करुन घ्यावे. यासाठी गेले 98 दिवस आंदोलन करत असुन सोमवार (दि 19) पासुन पाच कामगारांनी आमरण उपोषण सुरु केले असुन त्या पाच कामगारांपैकी एक असलेल्या महिला कामगाराची प्रकृती […]

अधिक वाचा..

वढू बुद्रुक मधील त्या कंपनीला भीषण आग

आगीमध्ये दोन कामगार जखमी तर कोट्यवधींचे नुकसान शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील एम फिल्टर या मास्कचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली असून आगीच्या लोळणे परिसरात मोठी खळबळ उडाली होती, तर या आगीमध्ये दोन कामगार किरकोळ जखमी झाले असून कंपनीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC तील फ्रेसोनिअस काबी कंपनीच्या कामगारांचे उपोषण मागे

शिरुर (तेजस फडके): रांजणगाव MIDC तील रांजणगाव औद्योगिक वसाहतीत फ्रेसोनिअस काबी कंपनीत मानवी हक्काचे उल्लंघन होत असल्याने या कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात शिरुर तहसील कार्यालयासमोर सोमनाथ भगत यांनी न्याय मिळण्यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. त्यांच्या उपोषणाला भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला होता. तसेच या उपोषणाला तालुक्यातील अनेक राजकीय पाठिंबा दिला होता. […]

अधिक वाचा..
crime

कोरेगाव भिमातील कंपनीमध्ये चोरी करणाऱ्यावर गुन्हा

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) कल्याणी फोर्जिंग कंपनी मधील कंपनीचे स्पेअर पार्ट चोरुन नेणाऱ्या कामगारावर गुन्हे दाखल करण्यात आले असून चोरी करणाऱ्या दीपनारायण रामप्रमोद तिवारी याच्या विरुद्ध शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील कल्याणी फोर्ज कंपनीमध्ये दीपनारायण तिवारी हा कामगार आहे. सदर कंपनी मधील एस […]

अधिक वाचा..

भिम आर्मीची कामगारांबाबत डाॅंगकाॅंग कंपनीशी सकारात्मक चर्चा

रांजणगाव गणपती (तेजस फडके): भिम आर्मी भारत एकता मिशन संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिताराम गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिरूर तालुका प्रभारी संदिप शेलार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार (दि 15) रोजी संविधानिक पध्दतीने जन आंदोलन करण्यात आले होते. रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील डाॅंगकाॅंग कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात या संघटनेने आवाज उठवला होता. यावेळी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ […]

अधिक वाचा..

डॉंगकाॅंग कंपनीच्या व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराबाबत भिम आर्मीचे बेमुदत धरणे आंदोलन

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या असलेल्या डॉंगकाॅंग कंपनीच्या व्यवस्थापनाने मनमानी कारभार करत कोणतीही पुर्वसुचना न देता तसेच कामगारांना अपमानास्पद वागणूक देवून, मारहाण, शिवीगाळ, नुकसानभरपाई न देता, खोटे आरोप करुन कायमस्वरुपी कंपनीत पर्मनंट असणाऱ्या काही ठराविक कामगारांना कामावरुन काढुन टाकले आहे. त्यामुळे जोपर्यंत या अन्यायग्रस्त कामगारांना न्याय मिळत नाही. तोपर्यंत कामगारांच्या […]

अधिक वाचा..

सणसवाडीतील कंपनीतून साडेसात लाखांचा ऐवज चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका कंपनीतून खिडकीचे गज उचकटून कंपनीतील सेन्सर सह कॉपर धातूचे साहित्य असा तब्बल 7 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. येथील) कृष्णलीला गार्डन मंगल कार्यालय शेजारील व्हीक्टोरा प्रायवेट लिमिटेड कंपनीतील सर्व […]

अधिक वाचा..
Crime

सणसवाडीत महिलेकडून कंपनीसाठी वीजचोरी: गुन्हे दाखल 

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका कंपनीत महिलेकडून कंपनीसाठी वीजचोरी झाल्याची घटना समोर आली असल्याने विद्युत वितरण कंपनीच्या वतीने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे रुपाली अशोक गरुड या महिलेवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथे रुपाली गरुड कंपनी असून सदर कंपनीमध्ये विजेच्या मीटर मधून त्यांनी चोरून वीज वापर सुरु केलेला होता. […]

अधिक वाचा..

वडापाव विकून उभारली 50 कोटींची कंपनी…

मुंबई: 23 ऑगस्ट म्हणजेच जागतिक वडापाव दिवस म्हणून साजरा केला जातो. कधीही भूक लागली तर चौकाचौकात मिळणाऱ्या वडापाव विकून कोट्यवधींची उलाढाल असणारा व्यवसाय सुरु करणाऱ्याविषयी माहिती असायलाच हवी. गोली वडापाव नावाने देशभर 350 आउटलेट्स असणाऱ्या वडापाव चेनची सुरुवात कल्याणमध्ये कशी झाली आणि वडापाव विकून 50 कोटींची उलाढाल कशी करतो याची प्रेरक कथा आहे. काही मुलांना […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC मधील ब्रिटानिया कंपनीत चोरी, 8 जणांवर गुन्हे दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव येथील औद्योगिक वसाहतीतील ब्रिटानिया इंडस्ट्रिज लिमीटेड या कंपनीत 24 ते 27 जुलै या कालावधीत बाहेरुन कंपनीत कच्चा माल घेऊन येणाऱ्या 8 चालकांनी संगनमत करुन कंपनीमधील 1 लाख 19 हजार 600 रुपये किंमतीच्या 920 किलोग्रॅम वजनाच्या पाम ऑईलची चोरी करुन विक्री केली असल्याने मतीन अली सय्यद (वय 40) यांनी याबाबत रांजणगाव […]

अधिक वाचा..