रांजणगाव MIDC तील पी व्ही सन्स कंपनीच्या कामगारांचे 98 व्या दिवशीही आंदोलन सुरुच

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील पी व्ही सन्स या कंपनीतील कामगार पगारवाढ आणि निलंबीत केलेल्या कामगारांना परत कामावर रुजू करुन घ्यावे. यासाठी गेले 98 दिवस आंदोलन करत असुन सोमवार (दि 19) पासुन पाच कामगारांनी आमरण उपोषण सुरु केले असुन त्या पाच कामगारांपैकी एक असलेल्या महिला कामगाराची प्रकृती खालवली असुन जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत आम्ही या जागेवरुन उठणार नसल्याचे कामगारांनी सांगितले.

या आंदोलनाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे राज्य सहचिटणीस नानासाहेब लांडे म्हणाले, गेले 98 दिवस आम्ही पी व्ही सन्स कंपनीच्या विरोधात लोकशाहीच्या मार्गाने काम बंद आंदोलन करत असुन कामगारा आयुक्तासमोर कंपनी प्रशासन आणि कामगार प्रतिनिधी यांच्या सुमारे दहा बैठका झाल्या. परंतु त्यात कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे सोमवार (दि 19) पासुन पाच कामगारांनी आमरण उपोषण सुरु केले असुन त्या पाच कामगारांपैकी एक असलेल्या महिला कामगाराची प्रकृती खालवली असुन जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत आम्ही या जागेवरुन उठणार नसल्याचे तसेच कामगारांना जीविताला काही धोका झाल्यास त्यास पुर्णपणे कंपनी प्रशासन जबाबदार असेल असेही लांडे यांनी सांगितले.