शिक्रापूरच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्पर्धेत बारा सुवर्ण पदके

बारा सुवर्ण, पाच रौप्य व सहा कांस्य पदकांसह दुसरे चषक शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील योगा कराटे सेंटरच्या खेळाडूंनी राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभाग घेत तब्बल 12 सुर्वणपदके, 5 रौप्य पदके तर 6 कांस्य पदके पटकावत दुसऱ्या क्रमांकाचे चषकाचे मानकरी झाले असल्याची माहिती योगा कराटे सेंटरचे व्यवस्थापक अमोल बारडोले यांनी दिली आहे. शिक्रापूर (ता. […]

अधिक वाचा..

शिक्रापुर आयडियल स्पोर्ट्सच्या खेळाडूंचे तायक्वांदो स्पर्धेत यश

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशन मधील तायक्वांदो क्रीडा खेळातील खेळाडूंनी शालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादित करत विविध पदके पटकावली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशन मध्ये कराटेच्या तायक्वांदो क्रीडा खेळाचे प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंनी नुकतेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य […]

अधिक वाचा..

मुखईच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै रामराव गेणूजी पलांडे प्राथमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची सोलापूर येथे होणाऱ्या सॉफ्टबॉल विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती मुख्याध्यापक सुधीर ढमढेरे यांनी दिली. मुखई (ता. शिरुर) येथील कै रामराव गेणूजी पलांडे प्राथमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी क्रिडा विभागाच्या वतीने बारामती येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये […]

अधिक वाचा..

शिरुरच्या ऋतुजा ठुबेची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी

शिरुर (तेजस फडके): तिरुअनंतपुरम (केरळ) येथे २० नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२२ दरम्यान सुरु असलेल्या ६५ वी नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिप कॉम्पिटिशन या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये १० मीटर पीप साईट एअर रायफल या प्रकारात ऋतुजा बाबासाहेब ठुबे हिने उत्कृष्ट कामगिरी करत मे २०२३ मध्ये होणाऱ्या ऑल इंडिया कुमार सुरेंदर सिंग शूटिंग चॅम्पियनशिप या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी […]

अधिक वाचा..

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्रीदत्त विद्यालयातील मुलींचे यश

शिरुर (अरुणकुमार मोटे): क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आयोजित आंतरशालेय मैदानी स्पर्धेत पिंपरखेडच्या श्रीदत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुलींनी यश संपादन केले. या खेळाडूंचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी पालक व ग्रामस्थांनी बक्षिस देऊन गौरव केला. सी.टी बोरा महाविद्यालय शिरुर येथे पार पडलेल्या […]

अधिक वाचा..

बाभुळसर खुर्द येथील श्रावणीची केरळ येथील स्पर्धेत उत्तम कामगिरी

शिरुर (तेजस फडके): तिरुअनंतपुरम (केरळ) येथे झालेल्या 65 व्या राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत शिरुर तालुक्यातील बाभुळसर खुर्द येथील श्रावणी संतोष वाळके हिने उत्कृष्ट कामगिरी केली असुन तिची 2023 मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला या स्पर्धेसाठी शिरुर येथील युनिक अ‍ॅकेडमीचे शिक्षक शरद तरटे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच श्रावणीचे आई-वडील व कुटुंबायांनीही […]

अधिक वाचा..

शिंदोडीच्या मुलींची तालुकास्तरीय स्पर्धेत बाजी

जिल्हास्तरीय स्पर्धेत 8 मुली आणि 3 मुलांची निवड शिरुर (तेजस फडके): पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या अंतर्गत चांदमल ताराचंद बोरा कॉलेज शिरुर या ठिकाणी नुकत्याच तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत शिंदोडी येथील कै हरुबाई उमाजी शितोळे विद्यालयातील आठ मुली व तीन मुलांची बारामती येथे होणाऱ्या […]

अधिक वाचा..

बीट स्तरीय स्पर्धेत सादलगाव अव्वल

मांडवगण फराटा (संपत कारकूड): यशवंतराव कला-क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाअंतर्गत न्हावरे बिट स्तरीय स्पर्धेत सादलगाव येथे (दि. १८) नोव्हेंबर रोजी झालेल्या क्रीडा स्पर्धेत सादलगाव जि. प. शाळेने मुले आणि मुलींच्या सांघिक स्पर्धेत खो-खो मध्ये लहान व मोठ्या या दोन्ही गटात विजेतेपद घेतले असून या शाळेला आता केंद्र स्तरावर खेळण्याची संधी मिळाली आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या खामकर, […]

अधिक वाचा..

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद मिळेल…

मुंबई: भारतीय ऑलिम्पिक संघ व गुजरात ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि गुजरात राज्य शासनाच्या सहकार्याने देशाची प्रतिष्ठित ३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गुजरात येथे (दि. २७) सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२२ या कालावधीत आयोजित केली जाणार आहे. भारतीय ऑलिम्पिक संघाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील पहिल्या 8 क्रमांकाचे महाराष्ट्रातील पुरुष व महिला संघ एकुण ३४ […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाईत मॅरेथॉन स्पर्धेने अमृतमहोत्सवाची सांगता

शिक्रापूर: कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न झाले असताना कै. फक्कड व कै. भाऊसाहेब शिंदे स्मृती मॅरेथॉन स्पर्धा नुकतीच संपन्न होत अमृत महोत्सवाची उत्साहात सांगता झाली आहे. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा संस्था यांनी मोठ्या […]

अधिक वाचा..