मुखईच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै रामराव गेणूजी पलांडे प्राथमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची सोलापूर येथे होणाऱ्या सॉफ्टबॉल विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती मुख्याध्यापक सुधीर ढमढेरे यांनी दिली.

मुखई (ता. शिरुर) येथील कै रामराव गेणूजी पलांडे प्राथमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी क्रिडा विभागाच्या वतीने बारामती येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील मुले संघात जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत विजय मिळविला. त्यामुळे त्यांची सोलापूर या ठिकाणी होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

सदर संघामध्ये कै रामराव गेणूजी पलांडे प्राथमिक आश्रमशाळेतील राज चाटे, उत्कर्ष निलख, स्वप्निल दौंड, स्वप्निल बांगर, सुरेश जाधव, अविनाश डोळे, परसराम मिसाळ, प्रथमेश शिरसाट, श्रेयस धनवटे, वैभव शिरसाट, जय जगताप, अथर्व रुपनेर, पृथ्वीराज तरवटे, आर्यन गर्दरे, अथर्व घोडे, आयुष आगळे या खेळाडूंचा समावेश होता. तर या शाळेतील मुलींच्या संघाने पुणे जिल्ह्यामध्ये सॉफ्टबॉल खेळात तृतीय क्रमांक मिळविला असून मुलींच्या संघामध्ये सिद्धी पानगे, रोहिणी धायतडक, श्रावणी तांबे, सकिता पानगे, तेजस्वी गांजे, स्नेहा घोडे, स्वाती शिरसाट, तनुजा केकान, स्नेहा मस्के, वेदिका गवारे, श्रेया सोडित, प्राची पोकळे, तन्वी पवार, निशा जवादे, श्रुतिका बरकडे, कल्याणी कदम या मुली खेळाडूंचा समावेश होता.

सर्व यशस्वी खेळाडूंना शिक्षक विष्णू सांगळे व प्रमिला क्षिरसागर यांनी मार्गदर्शन केले, तर सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे काळभैरव शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा जयश्रीताई पलांडे, कार्याध्यक्ष अशोकराव पलांडे, सचिव सुरेशराव पलांडे यांनी अभिनंदन केले आहे.