एक रुपयात पिक विमा शेतकऱ्यांच्या हितासाठी; आकाश वडघुले 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): निर्वी (ता. शिरुर) येथे आज (दि 22) रोजी शनिवार असल्याने हनुमान चालीसा व आरती कार्यक्रमाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन कृषी विभाग व भारतीय कृषी विमा कंपनी व एच डी एफ शी इर्बो कंपनी संयुक्त विद्यमाने पिक विमा जनजागृती अभियान, कॅम्प व पाठशालाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात आकाश वडघुले यांनी फळपिक विमा व प्रधानमंत्री पिक विमा योजना याबाबत माहिती सांगताना एक रुपयात आज काही येत नसले तर एक रुपयात पिक विमा मात्र निघतो आणि पिकांना संरक्षण मिळते ही बाब नक्कीच शेतकऱ्यांच्या हिताची सरकारने राबवविली आहे. तसेच निर्वी गावात 1275 खातेदार असून 50 टक्के खातेदारांनी म्हणजे जवळपास 608 खातेदारांनी पिक विमा उतरविला असुन हि बाब नक्कीच कौतुकास्पद असल्याचे मत आकाश वडघुले यांनी व्यक्त केले. खरीप हंगामात मुग बाजरी तुर भुईमुग पिकाचा विमा फक्त 1 रुपयात असुन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच सीएससी सेंटरवर जाऊन पिक विमा उतरविला जात असुन उर्वरित शेतकऱ्यांनी 31 जुलै अखेर पिक विमा उतरावा असे हि आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होणे कामी विनोद सोनवणे नंदकुमार सोनवणे मेजर व कृषी सहायक जयवंत भगत राजेश चौधरी आकाश वडघुले यांनी विशेष योगदान दिले.