थंडीत दवाखान्याची चक्कर टाळायची असेल तर करा तुळशीचा वापर, होतील आश्चर्यकारक फायदे 

तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. याचे वर्णन प्राचीन भारतातील ग्रंथांमध्येही आढळते. त्याचवेळी, त्याचे गुणधर्म वेदांमध्ये देखील सांगितले आहेत. तुळशीच्या बियांना सब्जा बियाणे, फालुदा बियाणे आणि तुकमरिया बियाणे अशा अनेक नावांनी ओळखले जाते. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. सर्दी झाली की तुळशीचा आणि लवंगाचा चहा प्यायला पाहिजे असे अनेकदा वडीलधारी मंडळी सांगतात. त्याचप्रमाणे तुळशीमुळे तुम्हाला […]

अधिक वाचा..

ग्रामीण रुग्णालय शिरूरमध्ये दंतचिकित्सकांची सेवा अडथळ्यात

सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांची तातडीने उपाययोजनांची मागणी शिरूर (अरुणकुमार मोटे): सर्वसामान्य ग्रामीण जनतेच्या आरोग्यसेवेचा केंद्रबिंदू असलेल्या शिरूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेमण्यात आलेल्या दंतचिकित्सकांना आवश्यक उपचार साधनसामग्री उपलब्ध नसल्यामुळे सेवा सुरळीतपणे सुरू करता येत नाही, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. ही बाब समजल्यानंतर याची गंभीर दखल घेत “सामाजिक कार्यकर्ते व व्हिसल ब्लोअर निलेश मंंदा यशवंत […]

अधिक वाचा..

मलठण ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरकडून परिचारिकेला शिवीगाळ करत धमकी; डॉ.राजेश जाधव निलंबित

शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता.शिरूर) येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका परिचारिकेला धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी व कर्मचाऱ्यांशी उद्धट वागल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकारामुळे रुग्णालयातील वातावरण तणावपूर्ण बनले असून, कर्मचारी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १६ एप्रिल रोजी परिचारिका विद्या गिरीगोसावी यांनी बाह्यरुग्ण विभागातील […]

अधिक वाचा..

रुग्णाला रुग्णालय ॲडमिट करण्यापूर्वी डिपॉजिट मागू शकते का? काय सांगतो कायदा

पुणे: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती तनिषा भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत. उपचार करण्याआधी अनामत रक्कम भरायला लावली गेली. या प्रकारामुळे समाजमन हेलावले असून अनेकांच्या मनात एकच प्रश्न घोळतोय: आपत्कालीन परिस्थितीत उपचाराआधी डिपॉझिट मागणे हे कायद्याने, नैतिकतेने आणि माणुसकीने कितपत योग्य आहे अशा प्रकारे अनामत रक्कम (डिपॉजिट) आकारण्याचा […]

अधिक वाचा..

पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; अतुल लोंढे

रुग्णालयातील अंतर्गत चौकशी ही निव्वळ धुळफेक, संबंधित डॉक्टरांवरही कठोर कारवाई करा मुंबई: पुण्यात सात महिन्याच्या गर्भवती महिलेचा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे बळी गेला, ही घटना ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. जनतेत मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीपणा विरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पण ना सरकार ना पोलीस प्रशासन कोणीही योग्य ती कारवाई केलेली नाही. या मातेचा मृत्यू […]

अधिक वाचा..

भगवती सर्वसाधारण रुग्णालयाचे खाजगीकरण थांबवा…

मुंबई: सन १९६८-६९ मध्ये बोरीवलीत ५० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात आले. पश्चिम उपनगर ते पालघर पर्यंत च्या वाढत्या लोकसंख्येमुळे ३६५ खाटांचे भगवती रुग्णालय महापालिकेतर्फे सुरू होते. नोबेल केमिस्टला जागा देऊन ट्रॉमा सेंटर सुरू करण्यात आले. बोरीवली रेल्वे स्टेशन झालेला बॉम्ब स्फोट, २००५ साली अति पर्जन्य वृष्टी कालावधीत या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात उपचार करण्यात आले. रेल्वे, […]

अधिक वाचा..

Video; पारोडी गावातील आरोग्यवर्धीनी उपकेंद्राला कायमच टाळं ; रुग्णालय वारंवार बंद तर डॉक्टर सतत गैरहजर…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील पारोडी येथील सरकारी आरोग्य उपकेंद्र कायमच बंद अवस्थेत आढळून येत असून येथे डॉक्टर व कर्मचारी हजर नसल्याच्या धक्कादायक प्रकार वारंवार उघडकीस येत आहे. त्यामुळे येथे उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शासनाने आरोग्य उपकेंद्रावर करोडो रुपये खर्च करून दोन मजली इमारत बांधून सर्व […]

अधिक वाचा..
dog-attack

शिरूरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा चिमुरड्यासह १५ ते २० जणांना चावा…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात पिसाळलेल्या दोन कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून दोन वर्षांच्या चिमुरडयासह १५ ते २० जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र घबराट उडाली आहे. या पिसाळलेल्या कुत्र्यांनी १५ ते २० जणांना चावा घेतला असून, सात जणांवर शिरूर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी ससून रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे, असे […]

अधिक वाचा..
cancer-help

शिरूर तालुक्यातील युवकाच्या उपचारासाठी हवाय मदतीचा हात!

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील एका युवकावर टाटा मेमोरिअल हॉस्पिटल परळ, मुंबई येथे उपचार सुरू आहेत. उपचारासाठी रू.१० लाख रुपयांची गरज आहे. मदतीचा हात आपण पुढे केल्यास उपचारासाठी मोठी मदत होणार आहे. युवकाच्या नातेवाईकांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील अनिल किसनराव शेळके (वय ३८) यांना फुप्फुसाचा कर्क रोग झाला आहे. उपचारासाठी मोठा […]

अधिक वाचा..
hospital-sidi

Video: रुग्णालयात भुताटकी? रात्रीच्यावेळी लाकडी शिडी लागली आपोआप चालू…

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा भरवसा नाही. कधी मनोरंजक व्हिडीओ समोर येतात. तर काही व्हिडीओ हे अंगावर काटा आणणारे असतात. सध्या अशाच एका व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. एक लाकडी शिडी स्वत:हून चालताना दिसत आहे. त्या ठिकाणी भूत असल्याचे अनेकांचे मत आहे. भूतामुळेच हा सगळा प्रकार असल्याचा अनेकांनी दावा […]

अधिक वाचा..