खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांची जाहीर माफी मागावी; पत्रकार संघाची मागणी

मुंबई: नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत वापरलेल्या आक्षेपार्ह, अवमानकारक आणि असंसदीय भाषेचा मुंबई मराठी पत्रकार संघाने तीव्र निषेध केला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना खासदार पाटील यांनी “माझे काय करायचे ते करा, समोर पोलीस आहेत, कमिशनरकडे तक्रार करा” अशा स्वरूपाची भाषा वापरल्याचा आरोप संघाने केला आहे. लोकप्रतिनिधींना […]

अधिक वाचा..

पत्रकारांशी झालेल्या वादाबाबत खासदार संजय पाटील यांची जाहीर माफी

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय पाटील यांनी पत्रकारांशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जाहीर दिलगिरी व्यक्त करत संपूर्ण माध्यम क्षेत्राची माफी मागितली आहे. वादाच्या प्रसंगी अनवधानाने वापरलेल्या अपशब्दांबद्दल खेद व्यक्त करत त्यांनी आपल्या राजकीय भूमिकेवर टीका करण्यास हरकत नसली तरी कुटुंबीयांना आणि दिवंगत वडिलांना राजकारणात ओढू नये, अशी भावनिक विनंती केली. पत्रकारांशी संवाद साधताना संजय पाटील म्हणाले […]

अधिक वाचा..

पत्रकार कल्याण महामंडळाचा घोळ; मंजूर निर्णय कुठे गायब?

‘आर्थिक विकास महामंडळ’ की पत्रकारांचा प्रश्न भरकटवण्याचा प्रयत्न? मुंबई: महाराष्ट्रात पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचा दावा असतानाही प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे हा निर्णय नेमका कुठे आणि कसा अडकला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पत्रकार आणि माध्यमकर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्या शीतल हरीष करदेकर यांनी जुलै २०२४ मध्ये […]

अधिक वाचा..

महामंडळ म्हणजे पत्रकारांसाठी ‘चॉकलेट’; प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर सक्षम वैधानिक व्यवस्था उभी करा; एस. एम. देशमुख

मुंबई: पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून पत्रकारांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्याऐवजी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या धर्तीवर महाराष्ट्रात सक्षम वैधानिक व्यवस्था निर्माण करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात देशमुख यांनी म्हटले आहे की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पत्रकारांसाठी […]

अधिक वाचा..

वंचित पत्रकारांना न्याय देण्यासाठी यंत्रणा सक्षम करण्याची गरज; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेत नियम १०१ अन्वये लक्षवेधी सूचनेअंतर्गत पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी जाहीर केलेले आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करून त्यांच्या कल्याणासाठी उपाययोजना करण्याबाबतचा मुद्दा विधानपरिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केला. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून बोलताना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांना येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणींकडे सरकारचे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या की, आचार्य बाळशास्त्री जांभेकर […]

अधिक वाचा..

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते महामंडळे पुढील अधिवेशनाच्या आत स्थापन करु; अँड आशिष शेलार

मुंबई: पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सरकारने जाहीर केलेले आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची कार्यवाही पुढील अधिवेशनाच्या आत करण्यात येईल, तसेच पत्रकारांच्या विविध विषयांवर पत्रकार संघटना, शासनातील विविध विभाग, संबंधित लोकप्रतिनिधी यांची एक व्यापक बैठक लवकरच घेण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री अशी शेलार यांनी आज विधान परिषदेत दिली. विधान परिषदेमध्ये आमदार श्रीकांत भारतीय यांनी आज लक्षवेधी […]

अधिक वाचा..

पत्रकारांना कॅशलेस आरोग्य सेवा देण्याबाबत समितीने अभ्यास करून प्रस्ताव द्यावा; हसन मुश्रीफ

मुंबई: राज्यातील पत्रकारांना कॅशलेस आरोग्य सेवा देण्यासाठी समिती स्थापन करावी. या समितीने महात्मा फुले जन आरोग्य योजना, केंद्र शासन आणि मध्यप्रदेश सरकारच्या योजनांचा अभ्यास करून सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. पत्रकारांसाठी वर्षातून दोन वेळा विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर […]

अधिक वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाकडून तीव्र निषेध

मुंबई: त्र्यंबकेश्वर येथे टोल वसुली करणाऱ्या कंत्राटी कर्मचारी गुंडांकडून पत्रकारांवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा ‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया'(माई) कडून तीव्र शब्दात निषेध करत आहे. या हल्लेखोरांवर तत्काळ कठोर कारवाई करावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून ही गुंडगिरी का होते आहे? याचा शोध घेऊन अशा व्यक्ती, प्रवृत्तींचा कायमचा बिमोड करण्याची गरज आहे. त्र्यंबकेश्वर येथे कुंभ मेळ्यासंदर्भात […]

अधिक वाचा..

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला करणा-या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे पत्रकार किरण ताजणे, योगेश खरे व अभिजीत सोनवणे यांच्यावर गुंडांकडून झालेला अमानुष हल्ला हा अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार आहे. जनतेचे प्रश्न निर्भीडपणे मांडणाऱ्या पत्रकारांना लक्ष्य करून करण्यात आलेली ही मारहाण म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरचा थेट हल्ला आहे, सरकारने या हल्लेखोर गावगुंडांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे […]

अधिक वाचा..

मुंबईत पत्रकारांसाठी राष्ट्रीय कार्यशाळा; नूतनीकरणीय ऊर्जा विषयावर माहितीची पर्वणी

मुंबई: मुंबई मराठी पत्रकार संघ आणि इंटरन्यूजच्या ‘अर्थ जर्नलिझम नेटवर्क’ (EJN) यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ते १८ ऑक्टोबर २०२५ दरम्यान नूतनीकरणीय ऊर्जेवरील राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी तामिळनाडू, महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेशातील पत्रकार व संवादकांना प्राधान्य दिले जाणार असून अर्ज करण्याची अंतिम मुदत १४ सप्टेंबर २०२५ रात्री १२ वाजेपर्यंत आहे. भारताने […]

अधिक वाचा..