पत्रकार शकील मणियार आणि रिजवान बागवान ‘सलाम इंडिया अभिमान’ पुरस्काराने सन्मानित

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात शिवराय फुले,शाहु,आंबेडकर चळवळीमध्ये प्रामाणिकपणे काम करणारे सामाजिक कार्यकर्ते पञकार रिजवान मौला बागवान यांना (सामाजिक) तर शकील याकुब मणियार यांना (पञकारिता) क्षेञातील 2023 चा सलाम इंडिया अभिमान (राष्ट्रीय) पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरव करुन सन्मानित करण्यात आले. हा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा 28 में 2023 रोजी नवी मुंबईतील वाशी येथील साहित्य मंदिरात पार पडला. यावेळी विविध क्षेञातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सलाम इंडिया अभिमान 2023 पुरस्काराने सामाजिक कार्यकर्ते रिजवान बागवान व शकील मणियार यांना सन्मानित करण्यात आल्याबद्दल त्यांचे सर्वञ कौतुक होत आहे.

पञकार रिजवान बागवान यांनी कोरोना काळात आपल्या जिवाची कुठलीही पर्वा न करता अहमदनगर शहरातील शासकीय जिल्हा रूग्णालयात कोरोना बाधित रूग्णांना मदतीचा हात देऊन त्यांना धीर देत त्यांच्या औषधोपचारासाठी सहकार्य केले होते. तर पञकार शकील मणियार यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातुन तसेच विविध वूत्तपञातुन गरीब व वंचित नागरिकांचे प्रश्न तसेच त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. याच उल्लेखनीय कार्याची दखल घेवुन त्यांना सलाम इंडिया अभिमान (राष्ट्रीय) पुरस्कार देण्यात आला आहे.

या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र,कर्नाटक,गोवा,केरळ,दिवदमण तटरक्षक पश्चिम क्षेञाचे कमांडर महानिरिक्षक मनोज वसंत बाडकर, सुप्रसिध्द अभिनेञी चिन्मयी सुमित, सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासनाचे अधिक्षक अभियंता डॉ.सलिम शेख, शिक्षण तज्ञ तथा शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.रमा भोसले, कुटुंब रंगलाय काव्यात फेमचे कवी विसूभाऊ बापट, सुप्रसिध्द गायक व शाहिर नंदेश उमप, लिज्जत पापडचे सीईओ सुरेश कोटे, नाट्य व सिने अभिनेञी राजेश्री काळे, एमव्हिएस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एन.डी.खान, प्रमुख संयोजक सलमा एन.खान आणि महाराष्ट्र राज्यातुन आलेले विविध क्षेञातील मान्यवर मोठ्या संख्येंने उपस्थित होते.