पिंपरी दुमालाचे ग्रामपंचायत सदस्य शरद खळदकर याचं सदस्यत्व कायम

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पिंपरी दुमाला गावचे ग्रामपंचायत सदस्य शरद नानाभाऊ खळदकर हे सन 2021 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग या जागेवर निवडून आले होते. त्यांच्या विरोधात निवडणूकीत पराभूत झालेले उमेदवार प्रमोद रविंद्र खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे खळदकर यांनी जातपडताळणी प्रमाणपत्र वेळेत दाखल न केल्यामुळे शरद खळदकर यांचे सदस्यपद रद्द व्हावे म्हणून तक्रार […]

अधिक वाचा..

उत्कृष्ट सदस्य होण्यासाठी विधान मंडळाच्या कामकाजामध्ये सहभाग वाढवावा

मुंबई: विधानमंडळाचे सदस्य म्हणून राज्याची धोरणे व विधेयकांना आकार देण्याची मोठी जबाबदारी सदस्यांवर असते. विधान मंडळाच्या पटलावर जे बोलले जाते त्याचे पुढे अभिलेख होत असते आणि भावी सदस्यांसाठी मार्गदर्शक ठरतात. त्यामुळे सदस्यांनी अभ्यासपूर्ण बोलले पाहिजे व आपल्याला मांडावयाचे मुद्दे योग्य रीतीने सभागृहात मांडले पाहिजे, असे सांगताना राज्य विधान मंडळाचे उत्कृष्ट सदस्य होण्यासाठी सदस्यांनी सभागृहाच्या कामकाजामध्ये […]

अधिक वाचा..

कारेगाव येथील गणेश ताठे यांची महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील भाजपा कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. नवीन प्रदेश कार्यकारिणीत १६ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस, १६ चिटणीस, ६४ कार्यकारिणी सदस्य, २६४ […]

अधिक वाचा..

पाबळच्या ग्रामपंचायत सदस्याला विभागीय आयुक्तांचा दणका

जिल्हाधिकाऱ्यांनंतर विभागीय आयुक्तांनी रवींद्र चौधरींना ठरवले अपात्र शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतचे सदस्य रवींद्र चौधरी यांच्यावर शासकीय जागेत अतिक्रमणाचा ठपका ठेवत यापूर्वी जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरवलेले असताना त्यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील केले असता विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवत ग्रामपंचायत सदस्य रवींद्र श्रीरंग चौधरी यांना अपात्र ठरवले असल्याने शिरुर तालुक्यात खळबळ उडाली […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात त्या उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्याला दणका

जिल्हाधिकाऱ्यां नंतर विभागीय आयुक्तांनी दोघांना ठरवले अपात्र शिक्रापूर (शेरखान शेख): खैरेवाडी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच नंदकिशोर गोडसे व ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर मांदळे या दोघांना यापूर्वी जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरवलेले असताना त्यांनी नुकतेच विभागीय आयुक्तांकडे अपील केले असता विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवत दोघांना देखील अपात्र ठरवले असल्याने शिरुर तालुक्यात खळबळ उडाली आहे. खैरेवाडी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील खैरेवाडी येथील उपसरपंच तसेच एक सदस्य अपात्र 

शिरुर (तेजस फडके): सरकारी जागेवर अतिक्रमण करणाऱ्या उपसरपंच तसेच एका सदस्यास पुणे विभागीय आयुक्तांनी दणका दिला असुन ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर प्रभू मांदळे आणि उपसरपंच नंदकिशोर काळूराम गोडसे यांना सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी अतिरिक्त विभागीय आयुक्त यांनी दि 2 फेब्रुवारी 2023 रोजीच्या आदेशान्वये अपात्र ठरवले आहे. यापूर्वी पुणे जिल्हाधिकारी यांनी दिलेला निकाल विरुद्ध सदरचे आपिल दाखल […]

अधिक वाचा..

पुणे जिल्हा बार असोशियनच्या सदस्यपदी ॲड. रेश्मा चौधरी बिनविरोध

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्हा बार असोशियनच्या सदस्यांची निवडणूक नुकतीच पार पडली असताना शिरुर तालुक्यातील ॲड. रेश्मा निलेश चौधरी यांची शिरुर तालुक्यातून पुणे जिल्हा बार असोशियनच्या कार्यकारिणी सदस्य पदी बिनविरोध निवड झाली असल्याने शिरुर तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे. तर ॲड. रेश्मा निलेश चौधरी यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर बोलताना वकिलांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार […]

अधिक वाचा..

उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसेना सभासद नोंदणी शुभारंभ सुरु…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आणि शिवसेना सभासद नोंदणीचा शुभारंभ मोठया थाटात चांडोह, फाकटे, वडनेर, पिंपरखेड, मलठण, केंदूर, करंदी, पाबळ, जातेगाव या ठिकाणी करण्यात आला. तसेच पिंपरखेडचे उपसरपंच यांनी या कठीण काळात शिवसेनेला साथ देत त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत शिवसेनेत प्रवेश केला आहे. आगामी काळात प्रत्येक गावात ही मोहीम जोरदारपणे […]

अधिक वाचा..