arrest

शिरूर तालुक्यात युवकाचा खून; खुनी दोन तासात पोलिसांच्या ताब्यात…

शिरूर (अरुणकुमार मोटे): वडनेर (ता. शिरूर) येथे आत्ताउल्ला उर्फ मोईन शाबिर खान (वय २२) या युवकाचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी (ता. २४) सायंकाळी ६.३० च्या दरम्यान घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी शाहिद शरीफ बागवान (रा. जाम मोहल्ला, भुसावळ रेल्वे स्टेशन, ता. भुसावळ, जि. जळगाव) याला दोन तासात अटक केली आहे. वडनेर-फाकटे रोडवर वडनेर […]

अधिक वाचा..

संभाजीनगर जिल्ह्यात एकाच दिवशी दोन खुनाच्या घटना उघडीस

पहिली घटना! दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने भाऊजीनेच केला मेहुण्याचा खून संभाजीनगर: कन्नड तालुक्यातील पिशोर जवळ असलेल्या तपोवन गावात दारूवरून भाऊजी-मेव्हण्यात झालेल्या वादात मेव्हण्याचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून झाल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंजीत अंकुश माळी (वय ४५ रा.घुसर ता.कन्नड ह.मू. तपोवन शिवार) असे मृताचे नाव आहे. […]

अधिक वाचा..
darshana pawar

दर्शना पवार हत्याकांडात थरकाप उडवणारी घटना; पोलिसांना सांगितले की…

पुणे : एमपीएससी परिक्षा पास झालेल्या दर्शना पवार हत्याकांडात थरकाप उडवणारी बाब समोर आली आहे. आरोपी राहुल हंडोरे याने दर्शनाच्या गळ्यावर आधी कंपासमधीस कटरने वार केले आणि नंतर तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली, अशी धक्कादायक माहिती राहुल याने त्याच्या कबुलीजबाबात दिल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच अनावधानाने आपल्या हातून हे कृत्य घडल्याचेही त्याने […]

अधिक वाचा..
ambadas-misal-jalna

जमिनीचा बांध कोरला म्हणून पुतण्याचा केला खून…

जालनाः शेतातील बांध कोरल्याच्या वादावरून चुलत्यानेच कुऱ्हाडीने वार करून पुतण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना जानेफळ दाभाडी या गावात घडली आहे. अंबादास मिसाळ असे मृत पुतण्याचे नाव असून, शिवाजी जयाजी मिसाळ असे आरोपी चुलत्याचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी मिसाळ आणि त्यांचा पुतण्या अंबादास मिसाळ यांचा जमिनीच्या बांधावरून अनेक दिवसांपासून […]

अधिक वाचा..

पुणे ग्रामीण पोलीसांनी वेल्हे येथील दर्शना पवार खून प्रकरणाचा केला उलगडा; आरोपी जेरबंद

शिरुर (तेजस फडके): वेल्हे पोलीस स्टेशन हद्दीतील गुंजवणे गावच्या हद्दीत सतीचा माळ या ठिकाणी दि 18 जुन 2023 रोजी दर्शना पवार हिचा मृतदेह आढळून आला होता. हा गुन्हा घडल्यापासून यातील संशयित सुधीर ऊर्फ राहुल दत्तात्रय हंडोरे, पळून गेला असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन पोलिस तपास पथकांनी संशयीत राहुल दत्तात्रय हांडोरे याचा शोध घेऊन त्याला मुंबई, अंधेरी […]

अधिक वाचा..
pune-rural-police

शिरूर तालुक्यात पेट्रोल टाकून प्रेत जाळणारे गजाआड; प्रेमसंबंधातून खून…

पुणे (तेजस फडके): शिरूर तालुक्यात खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने पेट्रोल टाकून प्रेत जाळणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व शिकापूर पोलिस पाच दिवसांमध्ये गजाआड केले आहे. वेबसिरिज पाहून खून करण्याची आयडिया आल्याचे आरोपीनी पोलिस तपासात सांगितले. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. दिनांक ०१/०६/ २०२३ रोजी सकाळी ०७.३० वाजणेचे पुर्वी शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीतील सणसवाडी […]

अधिक वाचा..
crime

वाघोलीत प्रेमप्रकरणातून प्रेयसीने केली प्रियकराची हत्या…

पुणे: वाघोली परिसरात प्रेमप्रकरणातून प्रेयसीने प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना आज (सोमवार) सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. प्रेयसी आणि प्रियकर दोघे राहत असलेल्या फ्लॅटमध्ये प्रियकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू […]

अधिक वाचा..

राहुलजी गांधींची खासदारकी रद्द करण्याची कृती म्हणजे लोकशाहीचा खून!

मुंबई: काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. कर्नाटकमधील २०१९ च्या एका सभेतील विधानाचा संदर्भ घेऊन खोटी तक्रार दाखल करत हा निर्णय घेतलेला आहे. राहुलजी गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा प्रयत्न भाजपा मागील काही दिवसांपासून करत होते. हे सर्व जाणीवपूर्वक व ठरवून केलेले असून खासदारकी रद्द करण्याचा भारतीय जनता पक्षाच्या […]

अधिक वाचा..

मित्रानेच केला मित्राचा खून, अवघ्या १२ तासांत लावला खूनाचा छडा

वाघोली: रस्ता चुकल्याच्या कारणावरून कंटेनर चालक व क्लीनर यांच्या झालेल्या वादातून अवजड हत्याराने मारहाण करून खून करणाऱ्या आरोपीला लोणीकंद तपास पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे अवघ्या 12 तासात जेरबंद केले आहे. शमशुल अली अहमद खान (वय २६) रा. उत्तरप्रदेश असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर शहजाद अब्दुल कयूम अहमद (वय २६) रा. उत्तरप्रदेश असे खून […]

अधिक वाचा..

मारहाणीचा जाब विचारल्याने सख्या भावाच्या डोक्यात घातली वीट…

शिरुर (अरुणकुमार मोटे): आण्णापूर (ता. शिरुर) येथे रामदास जाधव हा दारु पिवून स्वतःच्या मुलीला शिविगाळ करत असताना रामदासचा भाऊ कैलास जाधव याने याबाबत रामदासला तू का मुलीला शिवीगाळ देवून त्रास देतो. असा जाब विचारला असता सख्या भावाला व वहीनीला मारहाण केली आहे. याबाबत सविस्तर हकिकत अशी की, (दि. २६) जानेवारी रोजी सायंकाळी ०८ :३० वा. […]

अधिक वाचा..