crime

जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी; नऊ जणांवर परस्परविरोधी गुन्हे

शिक्रापूर (शेरखान शेख): पारोडी (ता. शिरुर) येथे वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये हमाणारी झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे राजेंद्र शेडगे, विकास शेंडगे, योगेश शेंडगे, ज्ञानेश्वर तुकाराम पिंगळे, अशोक हरिभाऊ शेंडगे, लंका अशोक शेंडगे, किरण अशोक शेंडगे, ज्योती चोरमले, लता थोरात या 9 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पारोडी (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

पिंपळे खालसात चोरट्यांचा धुमाकूळ, हातात कोयते घेऊन धाक

घराला लावल्या कड्या, शेजारील घराच्या कौलातून नागरिक बाहेर शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथे रात्रीच्या सुमारास अज्ञात पाच चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास धुमाकूळ घालून कोयत्यांचा धाक दाखवत महिलेच्या गळ्यातील सोने काढून घेत घरातील दागिने चोरुन घेऊन जात घराच्या कड्या बाहेरुन लावल्या. मात्र यावेळी नागरिक घरावरील कौले काढून बाहेर आल्याची घटना घडली याबाबत शिक्रापूर पोलीस […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात कामाच्या बहाण्याने युवतीवर बलात्कार

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे एका अल्पवयीन युवतीला काम शोधून देण्याच्या बहाण्याने ओळख करुन नंतर युवतीला कामाचे तसेच लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संदीप किसन बढेकर याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) नजीक राहणाऱ्या सदर अल्पवयीन युवती काम शोधत असताना […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: मन शांत असेल आणि घरात आनंदाचे वातावरण असेल. नोकरीच्या ठिकाणी वाद-विवाद टाळा. कला क्षेत्रात आवड निर्माण होईल. आरोग्याची काळजी घ्या. भाऊ-बहिणीसोबत वेळ घालवाल. उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत. वृषभ: कुटुंबासोबत एखाद्या धार्मिकस्थळी भेट देऊ शकता. कौटुंबिक जीवनात काही समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासात वाढ होईल. मित्र आणि आई-वडिलांच्या सहकार्याने […]

अधिक वाचा..

मराठी चित्रपट निर्माते कॅप्टन कल्पेश मगर यांना पितृशोक…

मुंबई: नुकताच येऊन गेलेल्या ‘वऱ्हाडी वाजंत्री’ या चित्रपटाचे निर्माते कॅप्टन कल्पेश मगर यांचे वडील रविंद्र हरिभाऊ मगर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने मुंबईत निधन झाले आहे. गेली काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर कांदिवली येथील ‘विन्स हॉस्पिटल’मध्ये उपचार सुरु होते. प्रकृतीत सुधारणा जाणवल्याने त्यांना घरी नेण्यात आले होते. मात्र काही दिवसांत पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर २ […]

अधिक वाचा..

वीज बिलात होणार मोठी वाढ

औरंगाबाद: राज्यातील वीजग्राहकांना वीज दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. सरासरी ७५ ते १ : ३० पैसे प्रति युनिट दरवाढ होण्याची शक्यता असल्याचे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीज तज्ञ प्रताप होगाडे यांनी प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे. वीज कंपन्यांची अकार्यक्षमता आणि अप्रामाणिकपणा चोरी आणि भ्रष्टाचारी कारभारामुळे वीज ग्राहकांना मात्र दर वाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे. […]

अधिक वाचा..

रांजणगाव येथे दिवसाढवळ्या कचरा जाळण्याचा भंगार ठेकेदारांचा उद्योग सुरुच

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील स्थानिक भंगार व्यावसायिकांनी औद्योगिक वसाहतीतुन आणलेला धोकादायक कचरा कोणत्याही स्वरुपाची प्रक्रिया न करता दिवसा ढवळ्या वेळेस जाळून टाकण्याचा सपाटाच लावला असुन त्यामुळे सर्व सामान्य नागरीकांना याचा विनाकारण त्रास होत आहे. तसेच धुरामुळे आसपासच्या परीसरातील झाडे, पशुपक्षी तसेच मानवी जीवनावर याचा विपरीत परिणाम […]

अधिक वाचा..

केंदूरमध्ये दत्त जयंती निमीत्त श्री रामकथा सोहळा

सोहळ्याला महिलांसह हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथे दत्त जयंती निमित्त श्री रामायण कथा सोहळा आयोजित करण्यात आलेला असून या सोहळ्यासाठी महिलांसह परिसरातील हजारो भाविक उपस्थित राहत असताना ह भ प समाधान महाराज शर्मा यांच्या माध्यमातून हा श्री रामकथा सोहळा करण्यात येत आहे. केंदूर (ता. शिरुर) येथे दत्त जयंती निमित्त […]

अधिक वाचा..

कासारीच्या पाणीपुरवठ्याला तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) गावासाठी शासनाच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी 3 कोटी सोळा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती प्रथम लोकनियुक्त सरपंच सुनिता भुजबळ यांनी सांगितले आहे. कासारी (ता. शिरुर) या गावची लोकसंख्या 4 हजार च्या आसपास असून सदर गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत निधी देण्याची मागणी शासकीय पातळीवर करण्यात येत […]

अधिक वाचा..

मुखईच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती धडे

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे आश्रमशाळा येथे लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बबनराव पोतदार, भरत सुरसे व दिनेश देवकर यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर व्याख्यानपर मार्गदर्शन केले असल्याने विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती धडे मिळाले आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे आश्रमशाळा येथे नुकताच लेखक आपल्या […]

अधिक वाचा..