केंदूरमध्ये दत्त जयंती निमीत्त श्री रामकथा सोहळा

शिरूर तालुका

सोहळ्याला महिलांसह हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथे दत्त जयंती निमित्त श्री रामायण कथा सोहळा आयोजित करण्यात आलेला असून या सोहळ्यासाठी महिलांसह परिसरातील हजारो भाविक उपस्थित राहत असताना ह भ प समाधान महाराज शर्मा यांच्या माध्यमातून हा श्री रामकथा सोहळा करण्यात येत आहे.

केंदूर (ता. शिरुर) येथे दत्त जयंती निमित्त आयोजित श्री रामायण कथा सप्ताह मध्ये प्रभू रामचंद्रांच्या जन्मापासून ते रावण वधापर्यंतची कथा सजीव पात्रासहित सांगितली व दाखवली जात आहे. कथेच्या चौथ्या दिवशी राम वनवास व केवट प्रसंग कथा सांगताना जनक राजांच्या पुत्री (सीतामाता) प्रेम व महाराज दशरथांचे पुत्र प्रेम, केवळ निस्सीम बंधु प्रेमापोटी सोबत वनवासासाठी निघालेले लक्ष्मणजी व प्रभू रामांचा त्याग व मर्यादा सांगताना शर्मा महाराजांना अश्रू अनावर झाले होते, तर स्त्रोते भावुक झाले होते.

या सोहळ्यासाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, माजी सभापती सुभाष उमाप, जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, उपसभापती सविता पऱ्हाड, दिपक साकोरे, अभिजीत साकोरे, रामशेठ साकोरे, उमेश साकोरे, मंगेश गावडे, दत्ता साकोरे, निलेश साकोरे, राम थिटे, बाबुराव साकोरे, युवराज साकोरे, हिराभाई मुलाणी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

दत्त जन्माचे किर्तन ह. भ. प. नामदेव महाराज चव्हाण यांचे होणार असून काल्याचे किर्तन समाधान महाराज शर्मा यांचे होणार आहे. कोरोना नंतर सदर सोहळा पहावयास मिळत असून असंख्य नागरिक यामध्ये सहभागी होत असल्याचे दिसत असल्याचे ह. भ. प. दत्तात्रय साकोरे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामशेठ साकोरे यांनी केले तर आभार दत्ता साकोरे यांनी मानले.