prostitute

रांजणगाव MIDC त हॉटेल व लॉज मध्ये वेश्या व्यवसाय जोमात

शिरुर: शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हॉटेल आणि लॉजवर मोठया प्रमाणात वेश्या व्यवसाय चालत असल्याची दबक्या आवाजात चर्चा असुन सूत्रांच्या माहितीनुसार रात्रीच्या वेळेस MIDC काही संशयित लोक फिरत असुन पोलिसांनी यावर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरीकांनी केली आहे. रांजणगाव MIDC मध्ये अनेक मल्टिनॅशनल कंपन्या आहेत. त्यामुळे मोठया […]

अधिक वाचा..
Farmer

शेतकऱ्यांसाठी ‘या’ 5 योजना ठरतायेत वरदान…

मुंबई: आपल्या देशात जवळपास प्रत्येक वर्गासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. ज्यांचा उद्देश गरजू आणि गरीब वर्गाला मदत करणे हा आहे. यामध्ये आरोग्य, रोजगार, विमा, रेशन अशा अनेक योजनांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक फायदेशीर योजना राबविल्या जात आहेत. या योजनांतर्गत शेतकऱ्यांना अनेक प्रकारचे आर्थिक व इतर फायदे दिले जातात. त्याचबरोबर सध्या या […]

अधिक वाचा..
Booster dose

बूस्टर डोसचा कालावधी झाला कमी: किती तो पहा

नवी दिल्ली: देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं कोरोना प्रतिबंधक लसीच्या बुस्टर डोसचा कालावधी कमी केला आहे. दुसऱ्या डोसनंतर ९ महिन्यांनी बुस्टर डोस दिला जात होता. हा कालावधी कमी करत ६ महिन्यांवर आणण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली. आरोग्य मंत्रालयानं निवदेनात म्हटलं की, यापूर्वी दुसऱ्या डोसनंतर ९ महिन्यांनी […]

अधिक वाचा..

करडे येथील एस टी बस स्थानक कॅन्टीनच्या बाजूला अतिक्रमण

आगार व्यवस्थापकांची तहसीलदार आणि पोलिसांकडे लेखी तक्रार शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील करडे येथील राज्य परिवहन मंडळाच्या बस स्थानकामधील कॅन्टीनच्या बाजूने स्थानिक रहिवाशांकडून अतिक्रमण केल्याबाबत शिरुर आगार व्यवस्थापक यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची दखल घेऊन शिरुर आगाराचे व्यवस्थापक यांनी पर्यवेक्षकांना प्रत्यक्ष पाहणी करुन अहवाल सादर करण्याची सूचना केली होती. त्यानुसार पर्यवेक्षकांनी बस स्थानकाची […]

अधिक वाचा..
Mathadi

रांजणगाव MIDC त ‘माथाडी’ च्या नावाखाली जबरदस्तीने ‘पैसे वसुली’

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत बाहेरुन कंपनीचे साहीत्य घेऊन येणाऱ्या वाहनांच्या चालकांकडून माथाडीच्या नावाने “बोगस पावत्या” फाडुन जबरदस्तीने पैसे वसुली केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असुन याबाबत कोणाकडेही वाच्यता केल्यास कंपनीत येणाऱ्या गाड्या बंद करण्याची धमकी दिली जात असल्याचे काही चालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. तसेच औद्योगिक वसाहतीत […]

अधिक वाचा..
Crime

गोलेगावातून शेतकऱ्याच्या शेतातील विद्युत मोटार चोरी

शिक्रापूर: गोलेगाव (ता. शिरुर) येथील गायकवाड वस्ती येथील शेतकरी सुखदेव गायकवाड यांनी त्यांच्या शेतातील विहिरीवर पाण्यासाठी पाण्यातील विद्युत मोटार बसवलेली होती, एक जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास गायकवाड शेतात पाणी देऊन घरी आले. दुसऱ्या दिवशी पुन्हा शेतातील विहिरीवर गेले असता त्यांना विहिरीमध्ये, मोटार बांधलेली दोरी मोकळी असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी पाहणी केली असता कोणीतरी मोटारची दोरी […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

धक्कादायक…! पोलीस ठाण्यातच मनोरुग्णाचा हाय व्होल्टेज ड्रामा

शिक्रापूर: शिरुर तालुक्यात पोलीस स्टेशन मध्ये वेगवेगळ्या घटना घडत असताना मागील आठवड्यात शिरुर पोलीस स्टेशन मधून एका आरोपीने पलायन केलेले असताना आता शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये एका मनोरुग्ण युवकाने हाय व्होल्टेज ड्रामा केल्याने खळबळ उडाली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी, कर्मचारी त्यांचे कर्त्यव्य बजावत असताना दुपारच्या सुमारास सणसवाडी येथील एका कंपनीतील […]

अधिक वाचा..

कोंढापुरीतील कंपनीत २२१ बाटल्या रक्तदानाचा विक्रम

शिक्रापूर: कोंढापुरी (ता. शिरुर) येथील ग्लॅट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड येथे कंपनीचे संस्थापक कै. वर्नर ग्लॅट यांच्या शंभराव्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल २२१ रक्तदात्यांनी रक्तदान करत रक्त संकलनाचा विक्रम करुन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. कोंढापुरी (ता. शिरुर) येथील ग्लॅट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड येथे कंपनी कामगार कमिटी व स्पंदन मेडिकल असोसिएशन यांच्या […]

अधिक वाचा..
Horoscope

जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल?

मेष: तुम्ही शुभ कार्यात सहभागी व्हाल. तुमचे बोलणे मधुर असेल, ज्यामुळे तुम्ही इतरांना तुमच्याकडे आकर्षित कराल. तुम्ही तुमच्या हुशारीने तुमचे काम यशस्वी कराल. कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. नोकरीत चांगले आर्थिक लाभ होतील आणि प्रभाव व वैभवात वाढ होईल. व्यापार्‍यांसाठी नफ्याची स्थिती आहे. वृषभ: आर्थिकदृष्ट्या मजबूत वाटेल. व्यवसायात समजूतदारपणाने काम केले तर अडचणी सुकर होतील. […]

अधिक वाचा..

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात नाना पटोले सहभागी

मुंबई: देशावर आणि राज्यावर आलेले संकट गंभीर असून या संकटातून जनतेची सुटका झाली पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या पूर्वजांनी बलिदान दिले, त्याग केला ते स्वांतत्र्य, लोकशाही व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आज धोक्यात आहे. देशावर आलेले हे मोठे संकट आहे या संकटातून देश वाचला पाहिजे. देश वाचला तर आपण वाचू त्यासाठी पंढरपूरच्या […]

अधिक वाचा..