Booster dose

बूस्टर डोसचा कालावधी झाला कमी: किती तो पहा

इतर

नवी दिल्ली: देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं कोरोना प्रतिबंधक लसीच्या बुस्टर डोसचा कालावधी कमी केला आहे. दुसऱ्या डोसनंतर ९ महिन्यांनी बुस्टर डोस दिला जात होता. हा कालावधी कमी करत ६ महिन्यांवर आणण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली.

आरोग्य मंत्रालयानं निवदेनात म्हटलं की, यापूर्वी दुसऱ्या डोसनंतर ९ महिन्यांनी अर्थात ३९ आठवड्यांनंतर बूस्टर डोस दिला जात होता. पण जगभरात कोरोनाच्या लसींबाबत जे नवे संशोधन सुरु आहे. त्यानुसार नॅशनल टेक्निकल ऍडव्हायजरी ग्रुपच्या (NTAGI) स्टँडिंग टेक्निकल सब कमिटीनं (STSC) हे निर्देशित केलंय की, बूस्टर डोसचा कालावधी ९ महिन्यांवरुन ६ महिन्यांवर अर्थात २६ आठवड्यांवर आणण्यात यावा.

unique international school
unique international school

मुख्तार अब्बास नक्वी यांचा अल्पसंख्यांक मंत्रीपदाचा राजीनामा
त्यामुळं आता १८ ते ५९ वयोगटातील व्यक्तींना दुसऱ्या डोसनंतर ६ महिन्यांनी तिसरा डोस अर्थात बूस्टर डोस घेता येईल. हा बूस्टर डोस या लाभार्थ्यांना प्रायव्हेट कोविड व्हॅक्सिनेशन सेंटरवर (CVCs) अर्थात खासगी लसीकरण केंद्रांवर सशुल्क घेता येईल. तर ६० वर्षांवरील नागरिक आणि फ्रन्ट लाईन वर्कर्सना सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत बुस्टर डोस घेता येईल.