‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या बातमीमुळे सात तासात ‘जॉन्सन’ सापडला; शिंदे कुटुंबियांनी मानले आभार

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथुन शिवसेना युवा जिल्हाप्रमुख बापुसाहेब शिंदे यांचा ‘जॉन्सन’ नावाचा सायबर इन हस्की जातीचा कुत्रा गुरवार (दि १३) रोजी सायंकाळी ८ वाजल्यापासुन बेपत्ता झाला होता. याबाबत ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने आज (दि १८) रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सात तासातच ‘जॉन्सन’ सापडला. त्यामुळे बापुसाहेब […]

अधिक वाचा..

रांजणगाव येथुन ‘सायबर इन हस्की’ जातीचा कुत्रा बेपत्ता; शोधुन देणाऱ्यास अकरा हजार रुपयांचे रोख बक्षीस…

कारेगाव (प्रतिनिधी) रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथुन शिवसेना युवा जिल्हाप्रमुख बापुसाहेब शिंदे यांचा ‘जॉन्सन’ नावाचा सायबर इन हस्की जातीचा कुत्रा गुरवार (दि १३) रोजी सायंकाळी ८ वाजल्यापासुन बेपत्ता झाला असुन त्याला शोधून देणाऱ्या व्यक्तीस रोख ११ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल असे शिंदे यांनी सांगितले.   गेल्या अनेक वर्षांपासुन ‘जॉन्सन’ या कुत्र्याचा आम्ही घरातील सदस्य […]

अधिक वाचा..

शिरुर; रांजणगाव येथील ‘अथर्व ज्वेलर्स’ या दुकानाचे शटर उचकटून १६ लाख २५ हजारांचे दागिने चोरीला…

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव गणपती येथील भांबार्डे रस्त्यावरील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेजारी असणारे ‘अथर्व ज्वेलर्स’ या सोन्याच्या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १६ लाख २५ हजारांचचा सोने व चांदीचा ऐवज लंपास केला असल्याची माहिती रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली.   याबाबत रांजणगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार (दि […]

अधिक वाचा..

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या दोन्ही बाजुला वडा पाव, कच्छी दाबेली, ओली भेळ तसेच इतर फास्ट फूड खाण्यासाठी हातगाड्या उभ्या असतात. तसेच पुणे-नगर महामार्गावर (Pune-Nagar Highway) रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गावात स्वीट होमचा सुळसुळाट झाला असुन यामध्ये मोठया प्रमाणात फास्ट फुड, जंक फुडच्या नावाखाली दर्जाहिन पदार्थ […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या सोसायटीचा भरणा करण्यासाठी धावून आले चेअरमन; बापुसाहेब शिंदे यांची शेतकऱ्यांना आर्थिक मदत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) मार्च महिना म्हणलं की सर्व शेतकऱ्यांना राष्ट्रीय बँका, पतसंस्था, सहकारी सोसायटी यांनी हप्ते भरण्यासाठी तगादा लावलेला असतो. अनेकवेळा शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे हप्ते भरण्यासाठी सावकारांच्या दारात जावे लागते. मार्च महिन्यात सोसायट्यांचा भरणा करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी आर्थिक ओढाताण होते. शेतकऱ्यांची ही आर्थिक ओढाताण टाळण्यासाठी रांजणगाव गणपती विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष […]

अधिक वाचा..

‘लंडन’ च्या पाहुण्यांनी घेतला ‘हॉटेल संदीप’ च्या जेवणाचा आस्वाद

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील पुणे-नगर महामार्गावर असलेल्या ‘हॉटेल संदीप’ या हॉटेल मधील शाकाहारी जेवणाचा थेट लंडन वरुन आलेल्या पाहुण्यांनी आस्वाद घेत चवीची तारीफ केली. तसेच लंडन मध्ये असे महाराष्ट्रीयन जेवण मिळत नसल्याचे सांगत पुन्हा भारतात आल्यानंतर नक्की ‘हॉटेल संदीप’ येथे जेवण्यासाठी येणार असल्याचेही आवर्जुन सांगितले.   पुणे-नगर महामार्गावर रांजणगाव गणपतीच्या […]

अधिक वाचा..

‘रांजणगाव’ मध्ये सत्ताधाऱ्यांच्या विजयापेक्षा विरोधकांच्या पराभवाचीच जास्त चर्चा

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत तीन विरोधकांनी एकत्र येत ग्रामपंचायतवर विजय मिळवत सत्ता काबीज केली. रांजणगावातील प्रस्थापित पुढऱ्यांच्या विरोधात तरुणाईने दंड थोपटले आणि विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांना कडवी झुंज दिली. त्यामुळे रांजणगाव मध्ये सत्ताधाऱ्यांच्या विजयापेक्षा विरोधकांच्या पराभवाचीच जास्त चर्चा सुरु आहे. रांजणगाव गणपती येथील ग्रामपंचायतच्या […]

अधिक वाचा..

रांजणगाव येथे संकष्ट चतुर्थी निमित्त श्री महागणपतीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती हे स्थान महाराष्ट्रातील अष्टविनायकामधील आठवे स्थान म्हणुन प्रसिद्ध असुन त्याचा लौकिक सर्व महाराष्ट्रात नवसाला पावणारा महागणपती म्हणुन आहे. आज (दि 3) रोजी संकष्टी चतुर्थी निमित्त पहाटे ५ वाजता श्रींचा अभिषेक करुन मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. तसेच आज संकष्टी चतुर्थी निमित्त श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथे जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे) जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या 87 व्या वाढदिवसानिमित्त (दि 15) रोजी रांजणगाव गणपती ग्रामपंचायतच्या वतीने गावांमध्ये वृक्षारोपण तसेच पर्यावरण संवर्धन हा कार्यक्रम आयोजित करण्यात होता. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके आणि सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावामध्ये ग्रामपंचायत साठवणूक गृहासमोरील मोकळ्या जागेत […]

अधिक वाचा..
crime

रांजणगाव गणपती येथुन इनोव्हा गाडीची चोरी

रांजणगाव गणपती:- रांजणगाव गणपती येथुन एक टोयाटो कंपनीची इनोव्हा गाडी चोरीला गेली असुन याबाबत राहुल निळोबा फंड (वय 37) रा.रांजणगाव गणपती, गायत्री भवन, आय सी आय सी आय बॅंकेच्या पाठीमागे ता शिरुर जि पुणे यांनी याबाबत रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल फंड हे रांजणगाव गणपती येथील […]

अधिक वाचा..