काँग्रेसविरोधाचे मुख्य कारण नेहरूविरोध आहे; कुमार केतकर

मुंबई: भाजपला लोकसभेमध्ये आणि अन्य काही राज्यांत बहुमत असले, तरी ते पूर्णपणे त्याच्या विचारधारेमुळे आहे किंवा त्याच्या राजकारणामुळे मिळालेले यश आहे असे नाही. भाजपचे सरकार हे काँग्रेसविरोधी विचारधारा, रणनीती आणि राजकारणातून सत्तेवर आलेले सरकार आहे. सर्व साधारणपणे भाजप आणि विशेषकरून मोदी जेव्हा काँग्रेस व नेहरूंवर सातत्याने हल्ला करत असतात, तेव्हा त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, भाजपला […]

अधिक वाचा..

पाबळ मध्ये किरकोळ कारणातून रिक्षा चालकाला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथे रिक्षा मध्ये प्रवाशी बसू न दिल्याचा जाब विचारल्याच्या वादातून एका रिक्षा चालकाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे योगेश उर्फ आप्पा चौधरी याचे विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पाबळ (ता. शिरुर) येथे सणसवाडी येथील संजय दरेकर हे रिक्षा घेऊन गेलेले असताना सदर ठिकाणी […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगरातील 50 हजार व्यापारी रस्त्यावर उतरणार; हे आहे कारण…

औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहरातील व्यापाऱ्यांकडून आस्थापना कर वसुली करण्यासाठी खासगी एजन्सी नियुक्त केल्याच्या निषेधार्थ महापालिकेने आस्थापना कराचा निर्णय रद्द केला नाही, तर शहरातील तब्बल 50 हजार व्यापारी रस्त्यावर उतरण्याचा इशारा व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दीला आहे. मात्र त्यापूर्वी व्यापाऱ्यांनी सामंजस्याने हा प्रश्र निकाली काढण्यासाठी स्थानिक आमदार-खासदार, पालकमंत्री यांच्यासह थेट मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिलेले असून त्यांच्याकडून सुद्धा […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अज्ञात कारणातून परप्रांतियाचा खून

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) वढू बुद्रुक रोड लगत अज्ञात कारणातून सुशांत अनिल करकरमर या परप्रांतिय इसमाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील वढू रोड लगत खराडे बिल्डींग मध्ये रफिक पठाण यांच्या खोलीत राहणारा सुशांत […]

अधिक वाचा..

किरकोळ कारणातून शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी

शिक्रापूर: कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील मावलाईचा मळा येथे राहणारे पांडुरंग गायकवाड व त्यांच्या शेजारी राहणारे संपत लोंढे यांच्यात शेजारील सांडपाणी घरासमोर येत असल्याने वाद झाला होता. त्या वादाच्या कारणातून संपत लोंढे व आदींनी गायकवाड यांच्या घरा समोर जाऊन बेकायदेशीर गर्दी जमवून गायकवाड यांना शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी देत घरा समोरील सांडपाण्याच्या कारणातून […]

अधिक वाचा..