छत्रपती संभाजीनगरातील 50 हजार व्यापारी रस्त्यावर उतरणार; हे आहे कारण…

महाराष्ट्र

औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहरातील व्यापाऱ्यांकडून आस्थापना कर वसुली करण्यासाठी खासगी एजन्सी नियुक्त केल्याच्या निषेधार्थ महापालिकेने आस्थापना कराचा निर्णय रद्द केला नाही, तर शहरातील तब्बल 50 हजार व्यापारी रस्त्यावर उतरण्याचा इशारा व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दीला आहे.

मात्र त्यापूर्वी व्यापाऱ्यांनी सामंजस्याने हा प्रश्र निकाली काढण्यासाठी स्थानिक आमदार-खासदार, पालकमंत्री यांच्यासह थेट मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिलेले असून त्यांच्याकडून सुद्धा सकारात्मक निर्णय न झाल्यास शहरातील तब्बल 50 हजार व्यापारी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील..

शहरातील व्यापारी नियमानुसार शॉप ॲक्ट, व्यावसायिक कर भरत असताना मनपाकडून आस्थापना कर लादला जात आहे. जर मनपाने निर्णय रद्द केला नाही तर 50 हजार व्यापारी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी आहे, असा इशारा जिल्हा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष लक्ष्मीनारायण राठी यांनी दिला आहे.