शिरूर तालुका शिक्षक पतसंस्था भ्रष्टाचाराच्या गर्तेत; संचालक मंडळ बरखास्त करण्याची नंदकिशोर पडवळ यांची मागणी

पतसंस्थेतील अनेक आर्थिक घोटाळ्यांचा आणि कारभारातील अपारदर्शकतेचा पर्दाफाश शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिक्षक सहकारी पतसंस्था ही एक विश्वासाची संस्था म्हणून ओळखली जात होती. मात्र गेल्या दोन पंचवार्षिकांमध्ये या संस्थेचा कारभार पूर्णतः बेजबाबदार, अपारदर्शक आणि भ्रष्टाचारग्रस्त झाला असल्याचा गंभीर आरोप माजी सभापती नंदकिशोर पडवळ यांनी सहाय्यक निबंधक शिरूर यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केला आहे . […]

अधिक वाचा..
sharvin-palande

शिरूरचे माजी आमदार काकासाहेब पलांडे यांचे नातू शर्विन पलांडे यांच्या दशक्रियेला लोटला जनसागर…

मुखई, २१ एप्रिल २०२५ (संतोष धायबर) : शिरूर तालुक्याचे सर्वाधिक लोकप्रिय माजी आमदार सूर्यकांत ऊर्फ काकासाहेब पलांडे यांचे नातू आणि कोकण भवन येथील उपायुक्त संजीव पलांडे यांचे सुपूत्र शर्विन ऊर्फ चिकू (वय २१) यांच्या दशक्रिये निमित्त शनिवारी (ता. १९) शिरूर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून जनसागर लोटला होता. शर्विन यांचे ऐन तारुण्यात निधन झाल्यामुळे उपस्थितांपैकी प्रत्येकजण हळहळ […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींमधील सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत २३ एप्रिल रोजी

शिरूर (अरुणकुमार मोटे): पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग व महिला यांच्यासाठी आरक्षण निश्चित करण्याच्या उद्देशाने आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही सोडत (दि. २३) एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता शिरूर तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृह क्रमांक १ येथे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात जुन्या वादातुन दाजीची मेहुण्याला बेदम मारहाण; गुन्हा दाखल 

शिक्रापुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथे रस्त्याच्या कडेला उभा राहुन क्रिकेट मॅच बघणाऱ्या मेहुण्याला जुन्या वादातून त्याचा दाजी आणि त्याच्या तीन मित्रांनी बॅट व स्टंप ने बेदम मारहाण केल्याप्रकरणी मेहुण्याने शिक्रापुर पोलिस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन किरण बबनराव थिटे, राम भोकनळ, लखन भोकनळ, सत्यम खेडकर या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांवर संकट! शिरूर तालुक्यात नदीपात्रातून दोन इलेक्ट्रीक मोटारी चोरीला

पोलिसांत गुन्हा दाखल, अज्ञात चोरट्यांचा शोध सुरु शिरूर (अरुणकुमार मोटे): शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रीक मोटारी चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. शिरूर तालुक्यातील म्हसे (संगमवाडी) येथील घोडनदी पात्रालगत अण्णापुर के.टी. बंधाऱ्याजवळून दोन शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या मोटारी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना 17 ते 18 एप्रिलदरम्यान घडली आहे.या प्रकरणी पोपट भाऊ खाडे (वय 65 वर्षे, […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात शेताच्या वादातून राडा

एका कुटुंबावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला, पाच जणांवर गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शेताच्या वाटेच्या वादातून एकाच कुटुंबावर पाच जणांच्या टोळक्याने लाठ्याकाठ्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना रांजणगाव सांडस येथे घडली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. ही घटना 18 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. प्रशांत सुरेश रणदिवे […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात खुनाचा प्रयत्न करणारा तरुण अटकेत

पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील करडे गावात पैशाच्या वादातून पिस्तूल रोखून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक संपत नवले (वय २३) रा. करडे, […]

अधिक वाचा..

जिवंत सातबारा मोहिमे अंतर्गत शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वारस नोंदणीसाठी विशेष मोहीम

नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन शिरूर (अरूणकुमार मोटे): महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आणि मा. जिल्हाधिकारी, पुणे व मा. उपविभागीय अधिकारी, शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तालुक्यात “जिवंत सातबारा मोहीम” राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत मयत झालेल्या खातेदारांच्या ७/१२ उताऱ्यावर त्यांच्या वारसांची नोंद करण्याची महत्त्वपूर्ण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (दि. १ एप्रिल ते ५ एप्रिल २०२५ या कालावधीत […]

अधिक वाचा..
pune-nagar-highway

पुणे-नगर महामार्गावरील ५६ किमी उड्डाणपुलाचा मार्गामध्ये पुन्हा बदल…

पुणे: पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी, अपघातांचे वाढते प्रमाण आणि पाणीटंचाईसारख्या समस्यांचा अखेर राजकीय आणि प्रशासकीय पातळीवरून गांभीर्याने विचार झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या ठोस निर्णयांमुळे महत्त्वपूर्ण बदल घडणार आहेत. मूळ नियोजनानुसार पुणे-शिरूर दरम्यान प्रस्तावित असलेला ५६ किमी लांबीचा दुमजली उड्डाणपूल वाघोली येथून सुरू होणार होता. मात्र अजित […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात दुचाकी चोरीचा धडाका सुरूच

तीन दुचाकी चोरीनंतर पुन्हा दोन दुचाकी चोरीला… शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील नागरिकांना तीन दुचाकी चोरीनंतर पुन्हा एकदा दुचाकी चोरीच्या घटनांचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसात तिन दुचाकी चोरीच्या घटनांनी शिरूर पोलिस यंत्रणेला धक्का दिला असतानाच, आणखी दोन नवीन मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची नोंद शिरूर पोलीस ठाण्यात झाली आहे. पहिली घटना मांडवगण फराटा येथे […]

अधिक वाचा..