kunal-kavitake

पारोडी येथील शेतकरी कुटुंबातील कुणाल कवितकेचे मोठे यश…

शिरूर तालुका

पहिल्याच प्रयत्नात महसूल सहाय्यक पदाला गवसणी!

रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील पारोडी येथील कुणाल अण्णा कवितके याने आपल्या जिद्द, परिश्रम आणि अभ्यासाच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. केवळ २५ व्या वर्षी आणि पहिल्याच प्रयत्नात त्याने महसूल सहाय्यक या प्रतिष्ठित पदाला गवसणी घातली आहे.

कुणाल हा शेतकरी कुटुंबातील मुलगा असून, त्याचे वडील पारोडी गावचे प्रगतशील बागायतदार म्हणून पंचक्रोशीत परिचित आहेत. कुणालच्या या यशामुळे गावकऱ्यांनी फटाके वाजवून, मिठाई वाटून आणि जल्लोष करून आनंद साजरा केला आहे.

३० एप्रिल २०२३ रोजी झालेल्या या परीक्षेत मिळवलेल्या या यशामुळे कुणालने आपल्या गावाचे आणि कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे. आपल्या यशाचे श्रेय त्याने पालक, शिक्षक आणि मित्रमंडळींच्या सततच्या पाठिंब्याला दिले आहे. कुणालच्या या यशामुळे परिसरातील अनेक तरुणांना स्पर्धा परीक्षांसाठी नवी प्रेरणा मिळाली असून, त्यांच्यात नवचेतना निर्माण झाली आहे.

कुणाल कुरंदळेचे अभियांत्रिकी सह वैद्यकीय प्रवेश परीक्षेत दुहेरी यश

Video: जि.प. शाळा चर्चेत! इयत्ता १तील विद्यार्थी म्हणतात 26 पर्यंत पाढे…

वयाच्या ६१ व्या वर्षी ‘वकील’ झालेल्या बाबुरावकाका पाचंगे यांचं प्रेरणादायी यश

साक्षी गायकवाड हिचे नीट परिक्षेतील यश म्हणजे शिरूर तालुक्याचा सार्थ अभिमान…

वडिलांची डॉक्टरकीची इच्छा पूर्ण करुन मानसी झाली आयआरएस!