तुमच्या नेत्यांच्या फोटोला जोड्यांनी मारले तर चालेल का?

विधानसभा परिसरात राहुल गांधींच्या बॅनरला जोडे मारणाऱ्यांवर कडक कारवाई करा; बाळासाहेब थोरात मुंबई: विधानभवन परिसरात राहुल गांधी यांच्या बॅनरवरील फोटोला चपला, जोड्यांनी मारहाण करण्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी घडला. अशा प्रकराचे विकृत प्रकार होणे पुर्णपणे चुकीचे, निंदनीय व लोकशाहीस मारक आहे. अशा प्रकारचे गैरवर्तन आपल्या कार्यकाळात झाले असून विधानसभा अध्यक्षांसाठीही हे योग्य नाही. या घटनेबाबत दोषींवर […]

अधिक वाचा..

दि मॅजेस्टिक आमदार निवासाच्या नुतनीकरण कामाचे भूमिपूजन

मुंबई: ‘दी मॅजेस्टिक’ या महाराष्ट्र राज्य विधानमंडळ अतिथीगृह तथा आमदार निवास वास्तुच्या नुतनीकरण कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्याचबरोबर या वास्तुच्या कोनशिलेचे अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाज तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सार्वजनिक […]

अधिक वाचा..

ओबीसींना लुटुन मुठभर मित्रांना देण्यासाठी मोदींना सत्तेत बसवलेले नाही

मुंबई: राहुलजी गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केल्याचे थोतांड रचत भारतीय जनता पक्ष राज्यात व देशात आंदोलनाची नौंटकी करत आहे. ओबीसी समाजाबद्दल भाजपाला किती प्रेम आहे हे दिसून आलेले आहे. निरव मोदी, ललित मोदी, विजय मल्ल्या, अदानी हे ओबीसींचे नाहीत, त्यांचा पुळका भाजपाला येण्याचे काय कारण? ओबीसी समाजाला लुटून मुठभर मित्रांना देण्यासाठी ओबीसी समाजाने नरेंद्र […]

अधिक वाचा..

हा पुरस्कार माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या तमाम मायबाप मतदारांचा; डॉ. अमोल कोल्हे

पुणे: दुसऱ्यांदा पुरस्कार मिळाल्याचा नक्कीच आनंद आहे. पण हा पुरस्कार माझा एकट्याचा नाही तर, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील तमाम मायबाप मतदारांचा आहे. त्यामुळे यापुढेही जनसामान्यांचे प्रश्न व मुद्दे लोकसभेत मांडण्याची जबाबदारी मी नक्की निभावेन अशी विनम्र प्रतिक्रिया पुन्हा एकदा संसदरत्न पुरस्कार मिळालेल्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. आपल्या खासदारकीच्या पहिल्याच […]

अधिक वाचा..

शिरुर तहसिल कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी दिव्यांगाचे आंदोलन

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने शिरुर तहसिल कार्यालयापुढे आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते.यावेळी शिरुर तालुक्यातील दिव्यांगाना पिवळे रेशन कार्ड देण्यात यावे तसेच अंत्योदय योजनेअंतर्गत धान्य देण्यात यावे.संजय गांधी निराधार पेन्शन योजना वेळेवर दर महिन्याला देण्यात यावी. संजय गांधी योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज केलेल्या दिव्यांगांची […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात हॉटेल चालक महिलेचा फोनवर विनयभंग

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौक परिसरातील हॉटेल चालक महिलेला वारंवार फोन करुन फोनवर विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बाबू मंडलिक व प्रवीण मंडलिक या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौक परिसरातील हॉटेल चालक महिलेच्या हॉटेल वर जेवण करण्यासाठी येत असल्याने बाबू […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात ग्रामपंचायतच्या निषेधार्थ समाज मंदिराला लागले अचानक टाळे…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) येथील कोयाळी पुनर्वसन येथे समाज मंदिराजवळ समाज बांधवांसाठी सुरु असलेले स्वच्छता गृहाचे काम जवळील शिक्षण संस्थेच्या सांगण्यावरुन ग्रामपंचायतने बंद केल्याच्या निषेधार्थ समाज बांधवांनी समाज मंदिराच्या मुख्य गेट ला टाळे ठोकून ग्रामपंचायतचा निषेध नोंदविला आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथील कोयाळी पुनर्वसन येथे समाज मंदिर परिसरात स्वच्छता गृह बांधण्याची मागणी नागरिकांनी […]

अधिक वाचा..

दहिवडीत ऊसाच्या ट्रॅक्टरला धडकून युवकाचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): दहिवडी (ता. शिरुर) येथील दहिवडी आंबळे रस्त्यालगत चांदणीचा घाट येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असेलल्या ऊसाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडकून सलमान सलीम मुलाणी या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अपघाताबाबत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. दहिवडी (ता. शिरुर) येथील दहिवडी आंबळे रस्त्याने सलमान मुलाणी हा […]

अधिक वाचा..

शिक्रापुरातील कंपनीतून साडेतीन लाखांचा ऐवज चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ॲलीकॉन कास्टलाय लिमिटेड कंपनीतील सुमारे 3 लाख 50 हजार रुपये किमतीचा ऐवज कंपनीच्या व्यक्तीचा विश्वास संपादन करुन चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे वसिम तवीर मनेर याचे विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर( येथील ॲलीकॉन कास्टलाय लिमिटेड कंपनीत वापरले जाणारे बजाज वाहनांचे […]

अधिक वाचा..

पोलिस कर्मचारी आत्महत्या प्रकरणी आरोपिंच्या पोलिस कोठडीत वाढ

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिक्रापुर येथे नेमणूकीस असलेले पोलिस कर्मचारी जितेंद्र ऊर्फ हरिभाऊ केशव मांडगे (वय 36) यांनी (दि 15) मार्च रोजी सांयकाळी 7 च्या सुमारास कारेगाव येथील नवलेमळा येथे एका शेतात असणाऱ्या विहीरीवरील लोखंडी राहटाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या मृत्यूस त्यांची पत्नी, सासरा आणि मेहुणा जबाबदार असल्याची फिर्याद पोलिस कर्मचारी जितेंद्र […]

अधिक वाचा..