माथाडीच्या नावाखाली “खंडणी” वसुल करणारा खरा सूत्रधार अजुनही मोकाट…?

भीम बटालियनच्या संस्थापक-अध्यक्ष अ‍ॅड आम्रपाली धिवार यांचा आरोप रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC त माथाडी च्या नावाखाली बोगस पावत्या देऊन “आर्थिक लूट” करणाऱ्या दोन जणांवर सोमवार (दि 6) रोजी रांजणगाव MIDC पोलिसांनी गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली. परंतु हे फक्त प्यादे आहेत. या प्रकरणातला खरा सूत्रधार जामिल स्टील कंपनीचा व्यवस्थापक राहुल भागवत आणि […]

अधिक वाचा..

सविंदणे गावच्या उपसरपंचपदी ऍड. भोलेनाथ पडवळ 

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरूर) येथिल ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ऍड. भोलेनाथ पडवळ यांची निवड करण्यात आली आहे. माजी उपसरपंच भाऊसाहेब लंघे यांनी राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पदासाठी ही निवडणूक घेण्यात आली. यावेळी ईश्वर पडवळ व भोलेनाथ पडवळ यांचा ऊपसरपंचपदासाठी अर्ज आल्याने झालेल्या गुप्त मतदानात भोलेनाथ पडवळ यांना ७/३ असे मतदान झाल्याने त्यांची ऊपसरपंचपदी निवड झाल्याचे निवडणुक […]

अधिक वाचा..

संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गोरगरीब रुग्णांसाठी देवदूत; प्रा डॉ तानाजीराव सावंत

करमाळा: सध्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत असून सर्वसामान्यांना उपचार करणे आटोक्याच्या बाहेर जात आहे अशा परिस्थितीत शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष घेत असलेली वैद्यकीय शिबिरे सर्वसामान्य रुग्णांसाठी आधार ठरत आहेत असे मत शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी व्यक्त केले. आज करमाळा येथे शिवसेनेच्या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या […]

अधिक वाचा..

वाहन चालकांना मोठा धक्का! महामार्गावरील टोल टॅक्सच्या दरात वाढ

औरंगाबाद: राष्ट्रीय महामार्ग (NH) आणि द्रुतगती मार्गांवरून प्रवास करणार्‍या वाहन चालकांना पुढील महिन्यापासून अधिक पैसे मोजावे लागतील. कारण भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) कडून 1 एप्रिलपासून टोलचे दर वाढवले जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्गावरील टोल टॅक्स धोरण राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम, 2008 नुसार, शुल्क दर दरवर्षी 1 एप्रिलपासून सुधारित केले जातील. विशिष्ट टोल मुद्द्यांवर वेळोवेळी […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांच्या सतर्कतेने बाप लेकीची भेट

टाकळी भिमातून गेलेली अल्पवयीन बालिका पालकांच्या स्वाधीन शिक्रापूर (शेरखान शेख): टाकळी भीमा (ता. शिरुर) येथून अल्पवयीन अकरा वर्षीय बालिका बेपत्ता झालेली असताना सदर बालिका शिक्रापूर पोलिसांच्या सतर्कतेने पालकांच्या स्वाधीन गेली असून बापलेकांची भेट घडल्याने ग्रामस्थांनी पोलिसांचे कौतुक करत पोलिसांचा सन्मान केला आहे. टाकळी भीमा (ता. शिरुर) चांदणी यादव हि 11 वर्षीय बालिका 1 मार्च रोजी […]

अधिक वाचा..

कोरेगाव भिमातील गोडावून मधून दोन लाखांचे साहित्य चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एका कंपनीच्या गोडावूनच्या खिडकीचे गज वाकवून गोडावून मधील सव्वा 2 लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील अल्टो इंजिनीअरिंग कंपनीच्या गोडावून मधून बनवल्या जाणाऱ्या जॉब साठी कंपनीने काही कच्चा माल आणून […]

अधिक वाचा..

पुण्याच्या व्यक्तीची शिरुर तालुक्यात फसवणूक; गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): आमदाबाद (ता. शिरुर) येथील जमीन विक्री करायची आहे असे सांगून पैसे घेऊन एका व्यक्तीची तब्बल 5 लाख 11 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे बाळू पंढरीनाथ नऱ्हे व बाबू बाळू नऱ्हे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आमदाबाद (ता. शिरुर) येथील बाळू नऱ्हे व बाबू नऱ्हे […]

अधिक वाचा..

माथाडीच्या नावाखाली आर्थिक लूट करणाऱ्या मूळ सूत्रधारावर कारवाई करुन अटक करा:- बाप्पुसाहेब शिंदे

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC त गेल्या अनेक दिवसांपासुन माथाडीच्या नावाखाली बोगस पावत्या फाडून ट्रक चालकांची “आर्थिक लूट” करणाऱ्या दोन जणांवर आज (दि 6) रांजणगाव पोलिसांनी ट्रक चालकाने फिर्याद दाखल केल्याने खंडणीचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे MIDC त खळबळ उडाली आहे. परंतु माथाडीच्या नावाने बोगस पावत्या बनवुन जबरदस्तीने “आर्थिक लूट” करणाऱ्या बड्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात माथाडीच्या बोगस पावत्या फाडल्याप्रकरणी दोन जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC मध्ये बोगस माथाडीच्या पावत्या दाखवत जबरदस्तीने खंडणी वसुल केल्याप्रकरणी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन मध्ये अमोल शिवाजी मलगुंडे तसेच प्रज्वल दादाभाऊ मलगुंडे दोघेही रा. ढोकसांगवी, ता. शिरुर, जि. पुणे या दोन जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत इम्तियाज मुस्ताक साह (वय 31 […]

अधिक वाचा..

भाजपा विरोधात लढण्यासाठी जे पक्ष येतील त्यांना सोबत घेण्याची काँग्रेसची भूमिका…

भाजपा सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतमालाला भाव नाही मुंबई: देशात २०१४ पासून लोकशाही व्यवस्था, संविधान, नियम कायदे पायदळी तुडवून मनमानी कारभार सुरु आहे. सर्व यंत्रणा मोदी सरकारने हातच्या बाहुल्या बनवल्या असून विरोधी पक्षांचा आवाज दडपण्यासाठी सत्तेचा वारेमाप गैरवापर केला जात आहे. लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतलेला असून भाजपा विरोधात लढण्यासाठी जे पक्ष एकत्र […]

अधिक वाचा..