शिक्रापूरच्या मुस्लीम बांधवांनी दिला सर्व धर्म समभावतेच संदेश
शिक्रापूर (शेरखान शेख): सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना आज शिक्रापूर येथे आगळावेगळा उपक्रम पहावयास मिळाला असून शिक्रापूर येथे मुस्लीम युवकांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करुन समाजाला सर्वधर्म समभावतेचा अनोखा संदेश दिला आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथे 10 वर्षापूर्वी शिक्रापूर गावातील मुस्लीम समाजाने एकत्र येत गावातील वेशीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आहे. सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी होत असताना गावातील सर्व मुस्लीम युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याचा निर्णय घेत भाजपा अल्पसंख्याक विभागाचे शिरुर तालुकाध्यक्ष हारुण इनामदार, उद्योजक समीर शेख, डॉ. शहारुक तांबोळी, सलीम तांबोळी, अमिर तांबोळी, शहिक तांबोळी, असिफ तांबोळी, साहिल तांबोळी, सिकंदर शेख, मोहम्मदभाई तांबोळी, अरिफ भाई तांबोळी यांसह आदी युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करत पुष्पहार अर्पण छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करुन समाजाला सर्वधर्म समभावतेचा अनोखा संदेश दिला आहे.
दरम्यान यावेळी बोलताना पुढील काळात देखील गावामध्ये मुस्लीम बांधवांच्या माध्यमातून शिवजयंती सह आदी उपक्रम राबवण्याचा निर्धार यावेळी मुस्लीम बांधवानी केली आहे.
मुस्लीम बांधवाचा उपक्रम कौतुकास्पद…
शिक्रापूर येथील मुस्लीम बांधव सर्व सन उत्सवांमध्ये नेहमी सहभागी होत असतात, सध्या या बांधवानी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करुन समाजाला अनोखा संदेश दिला असून मुस्लीम बांधवाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सरपंच रमेश गडदे यांनी सांगितले.