शिरुर- रामलिंग रोड झाला प्रकाशमय…

उद्योजक प्रकाश धारीवालांनी स्वखर्चाने रामलिंग रोडवर बसवल्या ९० स्ट्रीट लाईट  शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरापासून रामलिंग मंदीरापर्यत शिरूर -रामलिंग रोडवर दुतर्फा प्रसिद्ध उदयोजक प्रकाश धारीवाल यांनी स्वखर्चाने तब्बल ९० मोठे स्ट्रीट लाईट्स दिवे बसवले आहे. महाशिवरात्री निमित्त रामलिंग (ता. शिरूर) येथे यात्रेचे आयोजन असते. महाशिवरात्रीच्या दिवशी रामलिंग महाराजांच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक भक्त दर्शन […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील त्या शेतकऱ्यांचा विद्युत वितरणवर मोर्चा

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) सह परिसरात विद्युत वितरणच्या अधिकाऱ्यांनी कृषी पंपाच्या वीज बिल वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु केल्याने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जात असून काही ठिकाणी विद्युत रोहित्रच बंद केले जात असल्याने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी विद्युत वितरण कार्यालयावर मोर्चा काढून विद्युत वितरण विभागाचा निषेध नोंदवला आहे. तळेगाव ढमढेरे (ता. […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला दिवस कसा असेल…

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्त असणार आहे. व्यवसाय करणारे लोक व्यस्त असल्यामुळे त्यांच्या उर्वरित कामाकडे लक्ष देऊ शकणार नाहीत, जे नंतर त्यांच्यासाठी समस्या बनू शकते. कुठल्याही सरकारी कामात त्याचे नियम आणि कायदे पूर्णपणे पाळा आणि पूर्ण लक्ष द्या, अन्यथा ते लटकूनही बसू शकतात. वृषभ: व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. जर तुम्ही काही […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सर्वात सोप्या पद्धतीने इंग्रजी वाचन व लेखन करण्याच्या पद्धतीचा प्रा.शुभम थोरात यांनी लावला शोध…

शिरुर (अरुणकुमार मोटे): आमदाबाद (ता. शिरूर) येथील रहीवाशी प्रा. शुभम थोरात यांनी इंग्रजी भाषेचा सखोल अभ्यास करून जगातील सर्वात सोप्या पद्धतीने इंग्रजी वाचन व लेखन करण्याच्या पद्धतीचा शोध लावला असून त्याचे स्वॉप्टवेअर जुन महिन्यात मुलांसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्रभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुलांना इंग्रजी वाचन कसे करावे? इंग्रजी लेखन कसे करावे? याबद्दल […]

अधिक वाचा..

कसबा पेठ व चिंचवडच्या पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव करून सत्तेचा माज उतरवा…

देश जोडणाऱ्या राहुलजी गांधींबरोबर देश तोडणाऱ्या मोदींची तुलना कशी होऊ शकेल? मुंबई: भारतीय जनता पक्षाचे मंत्री, नेते हे सातत्याने महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करत आहेत. भाजपाकडून केला जात असलेला हा अपमान महाराष्ट्राचा अपमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला राजा समजू लागलेत तर […]

अधिक वाचा..

…तरच आरोग्य केंद्राचे आरोग्य सुधारेल

मांडवगण फराटा (संपत कारकूड): प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवगण फराटा येथील दवाखाना नवीन इमारतीत स्थलांतरित झाल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून येथे दिवसाला १०० ते २०० च्या दरम्यान रुग्ण प्राथमिक उपचार घेत असून नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता येथे रोज एकाला तरी तातडीने – अतितातडीने रुग्णवाहिकेची गरज लागते. परंतु 2 रुग्णवाहिका आणि […]

अधिक वाचा..

इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, इलेक्ट्रिक वाहने होणार स्वस्त?

औरंगाबाद: सीएनजी, पेट्रोल आणि डिझेल वाहनांव्यतिरिक्त आता बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. परंतु त्यांची किंमत जास्त असल्याने ग्राहकांना ही वाहने खरेदी करण्यासाठी थोडा विचार करावा लागतो, परंतु राज्यांनुसार सरकारकडून सबसिडी देखील दिली जात आहे. आता केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच इलेक्ट्रिक वाहनांबाबत मोठी घोषणा केली आहे. येत्या एका वर्षात […]

अधिक वाचा..

दहावी-बारावी परीक्षेबाबत मोठा निर्णय!

प्रश्नपत्रिका वाटल्यावर आलेल्या विद्यार्थ्याला परीक्षेसाठी नो एन्ट्री औरंगाबाद: दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त पार पडावी, यासाठी बोर्डाने प्रश्नपत्रिका १० मिनिटे अगोदर देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे परीक्षा सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत उशिराने आलेल्या विद्यार्थ्यास परीक्षेला बसण्यास दिली जाणारी परवानगी देखील बंद करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला पेपर सुरु होण्यापूर्वीच केंद्रावर हजर राहणे बंधनकारक असणार आहे. […]

अधिक वाचा..

हर्सूलमध्ये पाडापाडी सुरु, वाहतूक ४ दिवस बंद राहणार; या मार्गे वाहतूक वळवली…

बीड: औरंगाबाद शहर ते सिल्लोड राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. आज सकाळपासून हर्सूल येथील संपादित मालमत्ता बांधकाम पाडण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. यामुळे हर्सूल गावातून वाहतूक चार दिवस बंद करण्यात आली आहे. हर्सूल गावातील संपादित होणाऱ्या मालमत्ता बांधकाम पाडण्याची कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी १० फेब्रुवारीला जी २० च्या निमित्ताने झालेल्या बैठकीत दिले. त्यानुसार सोमवार […]

अधिक वाचा..

टाकळी हाजी येथे बैलाचा दशक्रिया विधी संपन्न… 

शिरुर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी येथील साबळे वाडीतील पोपट कोंडीबा साबळे यांनी त्यांच्या राजा या बैलाचा दशक्रिया विधी सोमवारी (दि. १३) संपन्न केला. साबळे यांच्या घरच्या गायी कडून जन्म झालेल्या गोऱ्हयाने शर्यतीमध्ये भाग घेवून अनेक घाट गाजविले आहेत. 24 वर्षे वयाच्या घरातील एक सदस्याचे (राजा बैलाचे) 10 दिवसांपूर्वी निधन झाल्याने त्यांनी हिंदू धर्म परंपरेने मनुष्याच्या […]

अधिक वाचा..