शिक्रापुरात शिवाजी कोण होता पुस्तकांचे वाटप

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील विद्याधाम प्रशाला विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शिरुर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने शिवाजी कोण होता? या पुस्तकीचे वाटप करण्यात आले.

शिक्रापुर (ता. शिरुर) येथील विद्याधाम प्रशाला विद्यालय तसेच तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार गुज़र प्रशाला येथे शिरुर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी काँग्रेसचे शिरुर तालुक़ाध्यक्ष वैभव यादव, युवक कॉंग्रेसचे शिरुर तालुकाध्यक्ष संकेत गवारे, कार्याध्यक्ष शरद दरेकर, युवा उदयोजक विशाल पाबळे, प्राचार्य सोनबापू गद्रे यांसह आदी शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे संस्कार लहानपनापासून विद्यार्थ्यांवर व्हावे आणि विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांना आदर्श मानून भविष्यात चांगले समाजहिताचे काम करावे या हेतूने सदर उपक्रम राबवत असल्याचे तसेच शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे, सणसवाडी, विठ्ठलवाडी, करंदी येथे देखील सदर पुस्तिकेचे वाटप करण्यात येणार असल्याचे युवक कॉंग्रेसचे शिरुर तालुक़ाध्यक्ष संकेत गवारे यांनी सांगितले.