पोलिस भरतीची लेखी परीक्षा ‘या’ तारखेला होणार…

महाराष्ट्र

औरंगाबाद: पोलीस भरतीच्या मैदानी परीक्षेनंतर लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांमध्ये अजुनही संभ्रम आहे. लेखी परीक्षांच्या तारखा अजूनही जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ही लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांकडून विचारणा करण्यात येत आहे. मात्र आता पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

एप्रिल महिन्यात लेखी परीक्षेची शक्यता

मैदानी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी एका पदासाठी 10 उमेदवारांची मेरिटनुसार लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे. त्यानुसार 1 लाख 83 हजार 310 उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतील. मात्र तृतीयपंथीयांची मैदानी परीक्षा झाल्याशिवाय पोलीस भरतीच्या उमेदवारांची लेखी परीक्षा होणार नाही. याबाबत निकष ठरल्यानंतर मार्चमध्ये त्यांची मैदानी चाचणी पार पडेल. दुसरीकडे दहावी-बारावीसह बहुतेक विद्यापीठांच्या परीक्षांमुळे केंद्रे उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे पोलिस भरतीची लेखी परीक्षा एप्रिल महिन्यात होऊ शकते; अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

असं असेल परीक्षेचे स्वरूप

लेखी परिक्षेत 100 वस्तुनिष्ठ प्रश्न असतील जे 90 मिनिटांत सोडवावे लागतील.

PST फेरी 50 गुणांची असेल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे.

लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटांचा असेल.

सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील.

चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत.

परीक्षा मराठीतूनच होणार आहे.

पोलीस भारती 2022 च्या प्रश्नपत्रिकेत चार स्वतंत्र विभाग असतील.

गुण विभागणी 

1) गणित – 25 प्रश्न, 25 गुण (Police Bharti 2023)

2) बौद्धिक चाचणी – 25 प्रश्न, 25 गुण

3) मराठी व्याकरण – 25 प्रश्न, 25 गुण

4) सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी – 25 प्रश्न, 25 गुण

एकूण 100 प्रश्नासाठी 100 गुण

एकूण वेळ – 90 मिनिटे