वाजेवाडी गाव पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतले दत्तक

शिक्रापूर (शेरखान शेख): वाजेवाडी (ता. शिरुर) हे शिरुर तालुक्यातील छोटेसे असलेले गाव यापूर्वी खासदार गिरीश बापट यांनी दत्तक घेतलेले होते. सध्या सदर गाव पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दत्तक घेतले असल्याने गावच्या विकासाला गती मिळणार असल्याचे माजी उपसरपंच अमित सोनवणे यांनी सांगितले. वाजेवाडी (ता. शिरुर) हे शिरुर तालुक्यातील लहानसे असलेले गाव गावामध्ये विकास करुन गाव आदर्श […]

अधिक वाचा..

सणसवाडीच्या त्या कंपनीतील साहित्य चोरणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल…

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी मधून कंपनीच्या दोघा कामगारांनी कंपनीच्या शॉप मधील साहित्याची चोरी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे प्रमोद विष्णू कांबळे व भरत बबन वाळूंज या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी मध्ये काही कामगार काम करत […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात ऊसतोड कामगार देण्याच्या बहाण्याने लाखोंची फसवणूक

जातेगावच्या व्यंकटेशकृपा कारखान्यातील घटना शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील व्यंकटेश कृपा शुगर मिल्स कारखान्याच्या ऊस तोड ठेकेदारास ऊस तोडणीसाठी कामगार पुरवितो असे म्हणून तब्बल 5 लाख 50 हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे किरण नथू पाटील या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

शिक्रपुरातील कचरा वाहतुकीसाठी ग्रामपंचायतच्या वतीने सहा ट्रॉली नागरिकांच्या सेवेत…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापुर (ता. शिरुर) येथील कचरा प्रश्न अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय झालेला असताना यापूर्वी झालेल्या ग्रामसभेत कचरा संकलित करण्यासाठी ट्रॉली बनवण्याचे ठरलेले असताना नुकतेच ग्रामपंचायतच्या वतीने सहा ट्रॉली नागरिकांच्या सेवेत देण्यात आल्या आहेत. शिक्रापूर (ता. शिरुर) गावातील कचरा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने नुकत्याच सहा ट्रॉली नागरिकांच्या सेवेत देण्यात आल्या आहे. याप्रसंगी सरपंच रमेश […]

अधिक वाचा..

निमोणे येथे ७२ वर्षीय व्यक्तीचा निर्घृनपणे खुन

शिरुर (अरुणकुमार मोटे): निमोणे (ता. शिरुर) येथील मोटेवाडीमध्ये आपल्या मुलीकडे काही दिवसांपुर्वी वास्तव्यास आलेले मनोहर चंदरराव शितोळे रा. सांगवी सांडस, ता. हवेली, जि. पुणे यांचा निमोणे- मोटेवाडी रोडलगत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या चेहऱ्यावर, कमरेवर, पाठीवर, गुप्तांगावर ठिकठिकाणी मारहाण करुन त्यांना गंभीर जखमी करुन त्यांचा निर्घृनपणे खुन केला आहे. त्याबाबत त्यांचा मुलगा राजाराम मनोहर शितोळे रा. सांगवी […]

अधिक वाचा..

अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी आहे की सरकारच्या कंत्राटदार मित्रांसाठी?

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प शनिवारी प्रशासक पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सादर केला. या अर्थसंकल्पावर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. हा अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी नसून वर्षा बंगल्यावरुन सरकारच्या कंत्राटदार मित्रांसाठी तयार करण्यात आलाय अशी सडकून टीका आदित्य ठाकरे यांनी केली. या अर्थसंकल्पात सगळी उधळपट्टी ही कंत्राटदारांसाठी सुरु असल्याचा […]

अधिक वाचा..

गांधीजींच्या मंत्राचा केंद्राला विसर मात्र आपण ती चूक करु नये; जयंत पाटील

मुंबई: महाराष्ट्राचा अर्थमंत्री म्हणून राज्याचा आर्थिक कारभार सांभाळल्यामुळे आपल्या अनेक शंकांसाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुढील मंत्र नक्कीच अंमलात आणावा असे विश्वासाने सांगू शकतो मात्र दुर्दैवाने केंद्रसरकारला त्याचा विसर पडला असून आपण ती चूक करु नये, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. […]

अधिक वाचा..

महिला अग्निशमन दलाच्या भरतीमधे गदारोळ, भरतीसाठी आलेल्या मुलींवर लाठीचार्ज…

मुंबई: मुंबईतील दहिसर पश्चिम येथील दिवंगत गोपीनाथ मुंडे मैदानावर महिला अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांची भरती सुरु होती. जिथे रात्रीपासून महिला जमा झाल्या होत्या आणि त्याच ठिकाणी भरतीची तयारी करत होत्या. मात्र सकाळी मुलींना गेटमधून आत जाऊ दिले नाही. त्यानंतर मुलींनी बीएमसी हाय हायच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. घोषणाबाजी दरम्यान पोलिस आणि तरुणींमध्ये बाचाबाची झाली. संपूर्ण महाराष्ट्रातून […]

अधिक वाचा..

भारत जोडो चे फलित काय?

मुंबई: अखिल भारतीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांची कन्याकुमारीपासून सुरू झालेली ‘भारत जोडो’ यात्रा काश्मीरमध्ये समाप्त झाली. गेल्या वर्षी ७ सप्टेंबर रोजी भारत जोडो यात्रा सुरू झाली आणि ३० जानेवारीला श्रीनगर येथे विराम झाला. तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीर अशा बारा राज्यांतून […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांनो तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर…

औरंगाबाद: तुम्हीही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण सरकार या महिन्यामध्ये 13 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करणार आहे. या फेब्रुवारी महिन्यांमध्ये शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचे 2 हजारे रुपये देण्यात येणार आहेत. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी 2015 साली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या […]

अधिक वाचा..