शिरुर तालुक्यातून दामूआण्णा घोडे प्रतिष्ठानच्या आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…

शिरूर तालुका

सविंदणे (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी चे आदर्श सरपंच दामू आण्णा घोडे यांच्या सहकार्याने दामूआण्णा घोडे प्रतिष्ठान शिरुर बेट भाग व पंचशील फाऊंडेशन अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान शिबीराचे उद्घाटन मंगळवार (दि. २०) सप्टेंबर रोजी मलठण येथे करण्यात आले आहे.

या शिबिराची सुरुवात मलठण येथून मंगळवार (दि. २०) सप्टेंबर रोजी गणेशा चरणी श्रीफळ फोडून करण्यात आली. यावेळी आदर्श सरपंच दामूशेठ घोडे, मलठण येथील माजी सरपंच विलासराव थोरात, प्रकाशभाऊ गायकवाड, सुभाष दंडवते, दत्तात्रय गायकवाड, नानाभाऊ फुलसुंदर, दादा गावडे, नाना शिंदे, बंटी बोडरे, गणेश जामदार, किरण देशमुख, बाळासाहेब नेवासकर, विजय राजगुरु तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष बन्सीशेठ घोडे, नारायण कांदळकर, अशोक मेचे, मारुती नरवडे, पंढरी उचाळे, संभाजी पवळे, ग्रामपंचायत सदस्य अशोक गावडे, भरत खामकर, राहुल रसाळ, राहुल काने, शेखर घोडे, गणेश घोडे, पिंटू घोडे आणि मलठण येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर शिबिर मंगळवार (दि. २० ते शनिवार (दि २४) सकाळी ९.०० ते सायं. ४.०० या वेळेत मलठण, जांबुत, कवठे येमाई, पिंपरखेड, टाकळी हाजी या गावांमध्ये राबविण्यात येणार आहे.

सदर शिबिरात मोफत…

1) डोळे तपासणी व डोळ्यांचे ड्रॉप वाटप

2) बी पी व शुगर तपासणी

3) डोकेदुखी,अंगदुखी, ताप, सर्दी, खोकला, त्वचेचे आजार, पोटाचे विकार, मणक्याचे आजार अशा सर्व आजारांवर मोफत औषधे वाटप

4) डोळ्यांसाठी नंबर लागल्यास 1 हजार रुपयांचा चष्मा फक्त १५० ते २०० रुपयात उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

सदर शिबिराचे आयोजन पुढीलप्रमाणे…

१) मंगळवार (दि. २०) सप्टेंबर रोजी मलठण (गणेश मंदिर) या ठिकाणी सकाळी ९ ते सायं ४ पर्यत.

२) बुधवार (दि. २१) सप्टेंबर रोजी जांबुत येथे (विठ्ठल रुक्मिणी मंदिर) या ठिकाणी सकाळी ९ ते सायं ४ पर्यत.

३) गुरुवार (दि. २२) सप्टेंबर रोजी कवठे येमाई (दत्त मंदिर) या ठिकाणी सकाळी ९ ते सायं ४ पर्यत.

४) शुक्रवार (दि. २३) सप्टेंबर रोजी पिंपरखेड येथे (हनुमान मंदिर) या ठिकाणी सकाळी ९ ते सायं ४ पर्यत.

५) शनिवार (दि. २४) सप्टेंबर रोजी टाकळी हाजी (विठ्ठल रुक्मिणी मंदिर) या ठिकाणी सकाळी ९ ते ४ या वेळेत संपन्न होणार आहे.

खराब हवामानामुळे आजारी पडणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे ‘एक पाऊल आरोग्याकडे’ म्हणून हा उपक्रम राबवत असल्याचे दामू आण्णा घोडे यांनी सांगितले.