सेक्स रॅकेट प्रकरणाने महाराष्ट्र हादरला; अशोक खरात अटकेत, SIT मार्फत सखोल चौकशी सुरू

छत्रपती संभाजीनगर: राज्यात खळबळ उडवणाऱ्या कथित सेक्स रॅकेट आणि लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी अशोक खरात याला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला २४ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ३५ वर्षीय महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात […]

अधिक वाचा..

तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली; रिलायन्स रुग्णालय येथे उपचार सुरू

मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने मुंबईतील रिलायन्स रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. तेजस यांना अस्वस्थ वाटू लागल्याने बुधवारी सायंकाळी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. आवश्यक त्या सर्व वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या असून उपचारानंतर […]

अधिक वाचा..

राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी सुरू; पहिल्या कलात महायुतीची आघाडी

मुंबई: राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी आज सकाळपासून सुरू झाली आहे. शनिवारी झालेल्या मतदानात जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समितींच्या 1,462 जागांसाठी मतदान पार पडलं होतं. या निवडणुकीत एकूण 7,438 उमेदवार रिंगणात होते. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांचा […]

अधिक वाचा..

साक्षी महाजन आणि अथर्व कर्वेच्या लग्नाची लगबग सुरु, फक्त तीन दिवस उरले

मुंबई: मराठी कलाविश्वात सध्या लग्नांचा उत्साह रंगत आहे. नुकताच ‘फ्रेशर्स’ मालिकेतील अभिनेता सिद्धार्थ खिरीडने लग्नगाठ बांधली, त्यानंतर लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतील ऋत्विक तळवलकरसुद्धा विवाहबंधनात अडकला. आता यात आणखी एक लोकप्रिय कलाकार जोडी सामील होणार आहे. अभिनेत्री साक्षी महाजन आणि अभिनेता अथर्व कर्वे लवकरच विवाहबंधनात अडकणार असून, त्यांच्या लग्नाची लगबग सुरु झाली आहे. साक्षीच्या घरी लग्नाआधीच्या विधींची […]

अधिक वाचा..

अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाला जबर धक्का; घातपात की अपघात यावर तीव्र चर्चा

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभावी नेते अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात निधन झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना दाट धुक्यामुळे विमान धावपट्टीचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहितीत सांगण्यात आले असले, तरी या घटनेमागे घातपात आहे का, यावर राज्यभर तीव्र चर्चा […]

अधिक वाचा..

WhatsApp आता मोफत राहणार नाही? ‘सबस्क्रिप्शन मॉडेल’ आणि स्टेटसवर जाहिरातींची तयारी

मुंबई: जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप ‘व्हॉट्सअॅप’ (WhatsApp) आता युजर्ससाठी मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत पूर्णपणे मोफत सेवा देणारा व्हॉट्सअॅप लवकरच ‘सबस्क्रिप्शन मॉडेल’ आणण्याची शक्यता आहे. यामुळे काही खास फीचर्स वापरण्यासाठी युजर्सना पैसे मोजावे लागू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, मेसेज पाठवणे आणि चॅटिंग सेवा पूर्वीप्रमाणेच मोफत राहणार आहे. मात्र हा बदल प्रामुख्याने ‘स्टेटस’ (Status) […]

अधिक वाचा..

काँग्रेसमध्ये कोणताही वाद नाही, काँग्रेसचा महापौर बनवण्यासाठी शिवसेना वंचित व मित्रपक्षांशी चर्चा सुरु

मुंबईत बिहार भवन तर पाटण्यात महाराष्ट्र भवन का नाही. जात, धर्म, भाषा व प्रांत मुदद्यावर राजकारण करण्याचा भाजपाचा अजेंडा मुंबई: महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जनतेने राज्यात तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनवले असून सर्वात मोठा विरोधी पक्ष बनवले आहे. आता चंद्रपूर, लातूरसह इतर शहरातील महापौरपदासाठी काम सुरु आहे. चंद्रपूरमध्ये पक्षात कोणताच वाद नाही, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार […]

अधिक वाचा..

लोखंडवाला गोळीबार प्रकरण! अभिनेता केआरके अटकेत, पोलिसांकडून चौकशी सुरू

मुंबई: अंधेरीतील वर्सोवा–लोखंडवाला परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, या प्रकरणात बॉलिवूड अभिनेता आणि वादग्रस्त रिव्ह्यूअर कमाल आर खान (KRK) याला पोलिसांनी अटक केली आहे. काल मध्यरात्री अंधेरी परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीनंतर त्याचा या घटनेतील सहभाग निष्पन्न झाल्याचा पोलिसांचा दावा आहे.या घटनेमुळे लोखंडवाला परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, फिल्म […]

अधिक वाचा..

पुणे महापालिका निवडणूक मतमोजणीसाठी जय्यत तयारी; अंतिम निकाल रात्री उशिरा येण्याची शक्यता

पुणे: पुणे महापालिका निवडणुकांच्या मतमोजणीसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून, १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता अधिकृत मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत बहुतांश प्रभागांचे निकाल जाहीर करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असला, तरी अंतिम प्रभागाचा निकाल रात्री १० वाजेपर्यंत लांबण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील १५ मतमोजणी केंद्रांवर ३३५ टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून, […]

अधिक वाचा..

त्रिशंकू कौल दिल्यानंतर शिरूर नगर परिषदेत सत्तास्थापनेसाठी हालचाल

उपनगराध्यक्षपदासाठी राजकीय खेळी रंगात; नेत्यांसोबत गुप्त बैठका, विजयी नगरसेवकांकडून पदांसाठी फिल्डिंग सुरू शिरूर (अरुणकुमार मोटे): बहुचर्चित शिरूर नगर परिषद निवडणुकीत मतदारांनी त्रिशंकू कौल दिल्यानंतर प्रत्येक पक्ष व प्रत्येक नगरसेवकाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून, आता सत्तास्थापना, उपनगराध्यक्षपद निवड तसेच विविध विषय समित्यांच्या अध्यक्षपदासाठी राजकीय हालचालींना जोर आला आहे. विविध पक्षांचे नेते व स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये गुप्त […]

अधिक वाचा..