ब्रेकिंग..! राज्यातील ‘या’ मंदिरांत नो मास्क नो एंट्री…

इतर

शिर्डी: कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर भारत सरकार पुन्हा अलर्ट झाले असून चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात देखील काळजी म्हणून उपाययोजना राबविण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आज दुपारी 3 वाजता सर्व राज्यातील आरोग्य मंत्र्यांना कोरोना परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली आहे.

राज्यात चाचणी, पाठपुरावा, उपचार आणि लसीकरणावर भर दिला जाणार आहे. मास्कसक्ती नाही, परंतु वृद्ध आणि अतिजोखीम असणाऱ्या लोकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करण्याचं व सुरक्षित अंतर ठेवण्याचं आवाहन राज्य सरकारने केलं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपुरातील विठ्ठल मंदिरातही मास्कबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

राज्यातील प्रमुख मंदिरात संबंधित मंदिर समिती/संस्थान यांच्याकडूनच मंदिर परिसरात भाविकांना मास्क घालण्याचे आवाहन करणारे फलक लावले जात आहेत.

या मंदिरात नो मास्क नो एंट्री…

शिर्डीतील साईबाबा मंदिरात येणाऱ्या भाविकांना मास्क परिधान करावा लागणार आहे. त्या शिवाय मंदिरात प्रवेश मिळणार नाही.

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात दर्शनासाठी येताना भक्तांना मास्क घालण्याचे आवाहन केले जात आहे.

कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात फक्त कर्मचाऱ्यांसाठी मास्क सक्ती केली आहे.

मुंबईतील मुंबा देवी मंदिरातील कर्मचाऱ्यांना तसेच भाविकांनाही मास्क वारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.