shirur-manipur-nivedan

शिरूर तहसील कार्यालयात धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन…

इतर

शिरूर (अरुणकुमार मोटे): मणिपुरात कायदा-सुव्यवस्था कोलमडली असून, व्यवस्थेचा निषेध करण्यासाठी शिरूरमध्ये शुक्रवारी (ता. ४) धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. धरणे आंदोलनाबाबत नायब तहसिलदार प्रकाश मुसळे यांना निवेदन देण्यात आले आहे.

मणिपुर राज्यात अनैसर्गिक हिंसाचार परिस्थिती हाताळण्यात अयशस्वी झालेल्या व्यवस्थेचा निषेध करण्यासाठी शिरूर तहसिल कार्यालय आवारात शुक्रवारी नागरीक धरणे आंदोलन करणार आहे. मणिपुर राज्यात महिलांच्या लैंगिक छळाच्या प्रकरणी राज्यातील व्यवस्था हाताळण्यामधे होवून उद्भवलेली परीस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार हतबल झाल्याचे दिसत आहे. ही गंभीर बाब असून मानवी हक्कांचे संरक्षण करण्यास “स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनीही व्यवस्था निर्माण करण्यास राज्यकर्ते कमी पडल्याचे दिसत आहे.

मानवी हक्कांचे झालेले उल्लंघन आणि महिलांच्या लैंगिक छळाच्या प्रकरणी निषेध करण्यासाठी सर्व महिला भगिनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने “तहसिल कार्यालय शिरूर येथे शुक्रवारी (ता. ४) सकाळी ११ वा. उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शिरूर तालुक्यात उपसरपंचाने केली व्यावसायिकास मारहाण…

शिरूर शहरातील व्यावसायिक अतुल कोहकडे यांचे निधन…

राज्य उप्तादन शुल्क नारायणगाव विभागाची कवठे येमाई येथे बनावट ताडीवर धडक कारवाई

आता सर्व सरकारी रुग्णालयात विविध चाचण्या मोफत होणार