पिंपळे खालसा येथील डावखरे विद्यालयातील तब्बल 57 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

इतर

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): पिंपळे खालसा- हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील स्वा. से. कै. शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालयाच्या 21 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीसाठी (एन.एम.एम.एस) आणि 36 विद्यार्थ्यांची सारथी शिष्यवृत्तीसाठी निवड झाली अशी माहिती प्राचार्य राजू घोडके यांनी दिली.

केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित इयत्ता आठवीसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती ही परीक्षा घेतली जाते यात शिष्यवृत्तीधारक प्रत्येक विद्यार्थ्याला 48,000 रुपये प्रमाणे 21 विद्यार्थ्यांना 10,08,000 रुपये आणि सारथी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याला प्रत्येकी 38,400 रुपये प्रमाणे 36 विद्यार्थ्यांना 13,82,400 रुपये अशी एकूण 23,90,400 रुपयांची शिष्यवृत्ती स्वा. से. कै. शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

एन एम एम एस शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी सोहम संदीप जाधव 128, नेत्रा माणिक जगताप 118, केशव संजय राठोड 118, साक्षी संगमेश्वर कानडे 11, निकिता चांगदेव तांबे 116, ओम ज्ञानेश्वर जाधव 115, पार्थ संजय साळुंखे 115, केशव शिवाजी जाधव 114, साई गणेश धुमाळ 113, वेदांत संदीप शिंदे 110, ओम संदीप शिर्के 105, आदित्य आप्पासाहेब राठोड 105, मोहन वैजनाथ केंद्रे 102, स्वराली संतोष शेवाळे 101, अनुष्का पांडुरंग शिर्के 99, शिवम ज्ञानेश्वर धुमाळ 98, सार्थक गोरक्ष भुजबळ 97, सिद्धी विठ्ठल गायकवाड 96, ऋतुजा राजाराम गायकवाड 95, तनुश्री नवनाथ हरेल 94, आदित्य गणेश झेंडे 82

सारथी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी आदित्य रविंद्र धुमाळ 107, सृष्टी संतोष धुमाळ 106, तन्मय अमीर धुमाळ 106, मनस्वी कैलास मासळकर 104, शार्दुल शरदचंद्र परभाणे 102, प्रांजल प्रदीप परभाणे 102, संकेत बाळासो मांदळे 101, अंजली रत्नदीप गाडेकर 101, प्रणव विक्रम मांदळे 98, अंजली एकनाथ धुमाळ 97, पायल विलास धुमाळ 97, करण खंडू मांदळे 95, सिद्धी सुरेश तांबे 94, प्रथमेश माणिक जगताप 92, प्रथमेश काळूराम साकोरे 92, उत्कर्ष सुनिल दौंडकर 90, प्रतिक सुभाष गावडे 90, श्रद्धा संजय शेडगे 90, सार्थक जीवन पलांडे 89, माधवराजे भगवान पडवळ 88, अंजली माणिक मांदळे 88, वैष्णवी नवनाथ खैरे 87, कार्तिक दत्तात्रय धुमाळ 86, कोमल संजय दोरगे 84, धनश्री शिवाजी तांबे 83, पियुष शशिकांत टेमगिरे 83, स्नेहा बबन जाधव 82, श्रावणी नवनाथ शेळके 82, प्रथमेश शिवाजी धुमाळ 78, शर्वरी नवनाथ कोऱ्हाळे 78, प्रतिक्षा सुजित धुमाळ 77, सार्थक शरद गरुड 77, साहिल नवनाथ जगताप 77, चतुर्थ दिलीप गोडसे 75, ओम अनिल तांबे 74, सिद्धी अनिल भोगावडे 72 या सर्व विद्यार्थांना मुख्याध्यापक राजू घोडके, अनिल जायभाय, मार्गदर्शक शिक्षक मोहन बोराटे, कल्याण कडेकर, अतुल गोडे सर, मनोज नायकवाडी, ऊर्मिला मांढरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष सोपान धुमाळ, उपाध्यक्ष शहाजी धुमाळ, खजिनदार शांताराम गायकवाड, सचिव एकनाथ झेंडे, खजिनदार शांताराम गायकवाड तसेच सर्व संचालक, सरपंच व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.