मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंदच शिक्षकांचा पुरस्कार; सुनंदा वाखारे

इतर

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्षक हे जिवंत घटकांबरोबर काम करत असून मुलांच्या निरागस व उदंड प्रेमाचे ते साक्षीदार आहेत. शाळेतील कामकाज करताना मुलांच्या जीवनावर कायमस्वरुपी परिणाम दिसून येईल काम करुन मुलांच्या चेहऱ्यावर आणलेले आनंद हेच शिक्षकांचा खरा पुरस्कार असल्याचे प्रतिपादन माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांनी केले.

शिरुर येथे शिरुर तालुका मुख्याध्यापक संघ आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरणा प्रसंगी बोलताना माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे बोलत होत्या, सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजीव फराटे हे होते.

याप्रसंगी शिरुर पंचायत समितीचे मजी सभापती राजेंद्र जासूद, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, दौंड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर, सेकंडरी स्कूल एम्पोईज को ऑपरेटिव्ह सोसायटीचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे, शिरुर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके, कार्याध्यक्ष प्राचार्य रामदास थिटे, सचिव मारुती कदम, उपाध्यक्ष प्राचार्य अनिल शिंदे, प्राचार्य तुकाराम शिरसाट, विलास घोडे, रामनाथ इथापे, बाळासाहेब चव्हाण, सेकंडरी स्कूल एम्पोईज को ऑपरेटिव्ह सोसायटीचे तज्ञ संचालक गुलाबराव गवळे, माध्यमिक संघाचे सोमनाथराव भंडारे, प्राचार्य अनिल साकोरे, प्राचार्य अशोक सरोदे, संजीव मांढरे, पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय भूगोल परिषदेच्या उपाध्यक्ष रत्नप्रभा देशमुख यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी पाबळ पद्ममणि जैन इंग्लिश मिडीयम स्कूलच्या अष्टपैलू व कार्यकुशल शिक्षिका जिजाबाई जितेंद्रकुमार थिटे यांसह आदी शिक्षकांचा गुणवंत शिक्षक पुरस्कार देउन शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांचे हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बोलताना आपल्या देशाला अनेक आदर्शवत व्यक्तीचा इतिहास असून त्यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर उभा करुन त्याच्या व्यक्तिमत्व विकासात चालना देणे गरजेचे आहे.

विद्यार्थी जीवनात बदला बरोबरच परिवर्तनाची गरज असून प्रत्येक विषयाच्या शिक्षकांपेक्षा विद्यार्थ्यांचे शिक्षक अशी संकल्पना अभिप्रेत असल्याचे शिरुर तालुका मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष प्राचार्य रामदास थिटे यांनी सागितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष खताळ यांनी केले तर शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य मारूती कदम यांनी आभार मानले.