कारेगाव येथील यश इन चौकात अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू 

क्राईम मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कारेगाव (ता. शिरुर) येथील यश इन चौकात शनिवारी रात्री 9 च्या दरम्यान अज्ञात पीक वाहनाने धडक दिल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असुन मनोहर गुलाबराव जाधव (वय 32) रा. पाचंगे वस्ती, ढोकसांगवी ता.शिरुर जि. पुणे, मूळ रा. सरांबा ता. देऊळगाव राजा जि. बुलढाणा असे त्या युवकाचे नाव असुन याबाबत त्याचा भाऊ अनंता गुलाबराव जाधव रा.पाचंगेवस्ती, ढोकसांगवी यांनी रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारेगाव येथील यश इन चौकात मयत मनोहर जाधव शनिवारी रात्री 9 च्या दरम्यान पुणे-नगर महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या पीकअपने जाधव याच्या गाडीला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सहायक फौजदार पासलकर हे या घटनेचा तपास करत आहेत.