शिरुर तालुक्यात किरकोळ वादातून तिघांकडून हल्ला; गुन्हा दाखल

क्राईम मुख्य बातम्या

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव गणपती येथे गाडी रस्त्यावर उभी केल्याच्या किरकोळ कारणावरुन तिघांनी मिळून दोन भावांवर लोखंडी रॉड आणि दगडाने हल्ला करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली असुन यामध्ये एका भावाच्या डोक्याला गंभीर मार लागला असुन दुसऱ्याच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. या प्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत आकाश संजय बत्ते (वय ३०) रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे यांनी फिर्याद दाखल केल्याने अभिजीत नंदू बत्ते, अनिकेत नंदू बत्ते आणि नंदू आनंदराव बत्ते (सर्व रा. रांजणगाव, ता. शिरुर, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. ४ जुन २०२५ रोजी सकाळी १०:३० च्या दरम्यान फिर्यादी आकाश बत्ते यांनी आरोपी अभिजीत बत्ते यास त्याची क्रेटा कार (एम एच १२ / ९४००) रस्त्यावर उभी का केली आहे असे विचारले. यावरुन रागावलेल्या आरोपींनी फिर्यादी आकाश बत्ते आणि त्यांचा भाऊ विकास बत्ते यांना शिवीगाळ करत लोखंडी रॉड व दगडाने बेदम मारहाण केली. या घटनेचा पुढील अधिक तपास रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार अजित पवार हे करत आहेत.

रांजणगाव येथील तिहेरी खून प्रकरणाचा अवघ्या १२ दिवसांत उलगडा पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी

शिरुर तालुक्यात ग्रामपंचायत निधीचा अपहार; तत्कालीन सरपंचांसह दोघांवर गुन्हा दाखल

शिरुर तालुक्यात रस्त्याच्या कामादरम्यान टँकरच्या धडकेत मजुराचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल