शिरुर मधील दहा खाजगी शाळांचा भ्रष्टाचार; पालकांची लूट थांबवण्यासाठी आमरण उपोषण

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केलेल्या चौकशी अहवालानुसार शिरुर मधील दहा खाजगी शाळा आणि संस्थांनी गेल्या काही वर्षांत नियमबाह्य कारभार आणि भ्रष्टाचार केला आहे. या दोषी शाळांची मान्यता तात्काळ रद्द करुन त्या शासनाच्या ताब्यात घेऊन, शिक्षण विभागामार्फत प्रशासक नेमून कामकाज चालवण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नाथा पाचर्णे यांनी केली आहे.

 

सन २०१८–१९ शैक्षणिक वर्षांपासुन या शाळांनी पालकांकडुन बेकायदेशीर पद्धतीने वसुल केलेले शुल्क परत करण्यात यावे. तसेच पालकांची वर्षानुवर्षे होत असलेली लूट थांबवण्याऐवजी या शाळांना पाठीशी घालणाऱ्या आणि आपल्या कर्तव्यात कसुर करणाऱ्या भ्रष्ट शिक्षण अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणीही पाचर्णे यांनी केली आहे.

 

या सर्व मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानात अनेक विद्यार्थी व पालकांसह सामाजिक कार्यकर्ते नाथा पाचर्णे यांनी आज (दि १३) रोजी आमरण उपोषण आंदोलन सुरु केले आहे. हा लढा प्रत्येक पालकाच्या न्यायासाठी आणि शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी असल्याचे यावेळी पाचर्णे यांनी सांगितले.

Video; रांजणगावमध्ये मोबाईल शॉपीमध्ये चोरीचा प्रयत्न अयशस्वी; गॅस एजन्सीत १५ हजारांची चोरी

Video; शिरुर महसूलचा वाळू माफियांना दणका; ६ बोटी व ८ फायबर जिलेटिनच्या साह्याने उध्वस्त

Video; रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन जवळच मध्यरात्री चोरीचा प्रयत्न

Video; महसुल दिनाच्या पुर्व संध्येला घोड धरणात महसूलने वाळूमाफियांच्या दोन यांत्रिक बोटी उडवल्या