शिरूर (अरुणकुमार मोटे): नवरात्र उत्सवाच्या सातव्या दिवशी भांबर्डे (ता. शिरूर) येथे माता मळाई देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांचा जनसागर उसळला. पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी माता मळाई देवीचे मनोभावे दर्शन घेतले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या माध्यमातून भव्य व्यवस्था करण्यात आली होती.
रोज .पहाटे पाच वाजता विधिवत पूजेनं उत्सवाला प्रारंभ होतो.तर सकाळी आठ वाजता महाआरती मोठ्या भक्तिभावात संपन्न होते. दिवसभर धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांनी गावाचे वातावरण उत्सवमय झाले आहे.
दररोज देवीभक्तिगीतांच्या कार्यक्रमाने वातावरण भारावून जात आहे. समाजकार्याच्या दृष्टीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यशस्विनी कला मंच, पुणे प्रस्तुत अभिनेत्री गौतमी यांचा मंगळागौरचा कार्यक्रम संपन्न झाला, ज्याला महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, आलेल्या भाविकांसाठी दररोज ५०० किलो खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात येत आहे.दि. २८ रोजी झालेल्या महाआरतीचे मानकरी मंगलदास बांदल, धरमचंद फुलफगर एपीआय मनीषा पिंगळे व राजेंद्र भटोरा हे होते. दररोज हरिकीर्तन,दांडीया, मंगळागौर,होम मिनिस्टर असे वेगवेगळे कार्यक्रम साजरे होत आहे त्यामुळे वातावरण भक्तिरसात रंगून जात आहेनवरात्र उत्सवातील हे सोहळे भाविकांच्या मनात अविस्मरणीय ठरले असून, भांबर्डे गाव नवरात्रोत्सवात धार्मिक व सांस्कृतिक एकतेचे केंद्र ठरले आहे.