Shikrapur Police Station

Video: शिरूर तालु्क्यातील चिमुकल्याची समलिंगी संबंधाच्या विरोधामुळे हत्या? एक ताब्यात…

शिरूर : शिरूर तालुक्यातील दहिवडी गावातील मांजरे वस्ती येथे साई मांजरे या सहावीत शिकणाऱ्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समलिंगी संबंधाला विरोध केल्यामुळे चिडून नराधमाने साईराजचा काटा काढला असावा, असा संशय पोलिसांना आहे. सध्या पोलीस संशयित आरोपीची कसून चौकशी करत असून, पोस्टमॉर्टम अहवालानंतर हत्येचे नेमके गूढ उकलणार आहे. सदर मृत्यू हा […]

अधिक वाचा..

पिकअप गँगचा धडाकेबाज पर्दाफाश; तिघे जेरबंद, ५ गुन्ह्यांचा भंडाफोड

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शेतवस्तीवरील वयोवृद्धांना लक्ष्य करत दरोडे टाकणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलिसांनी पर्दाफाश करत मोठे यश मिळवले आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन दरोडे आणि तीन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री खैरेनगर (ता. शिरूर) येथे चार अज्ञात […]

अधिक वाचा..

ठाण्यात खंडणीखोर टोळीचा पर्दाफाश; दोन लाखांची मागणी करणारे दोघे अटकेत

ठाणे: ठाण्यातील प्रसिद्ध ‘गौरव स्वीट्स’ या मिठाई दुकानाबाहेरील स्टॉलवर महापालिकेमार्फत कारवाईची भीती दाखवत दोन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या सुशांत सुर्वे आणि त्याच्या सहकाऱ्याला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत सुर्वे याचा यापूर्वीही लाचलुचपत प्रकरणाशी संबंध आला होता. ठाणे महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त शंकर पाटोळे यांच्याशी संबंधित लाच प्रकरणात त्याला अटक झाली होती. जामिनावर सुटल्यानंतर […]

अधिक वाचा..

मावळमध्ये दुर्दैवी अपघात; गॅस सिलेंडरच्या टेम्पोखाली सापडून ११ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

  पुणे: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोखाली सापडून ११ वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथे हा अपघात घडला. ज्ञानेश्वरी मुऱ्हे (वय ११) असे मृत मुलीचे नाव आहे. सोमाटणे फाटा […]

अधिक वाचा..

प्रेमसंबंधातून तरुणाची क्रूर हत्या; प्रेयसीच्या कुटुंबीयांसह ६ जण अटकेत

पुणे: कोथरुड परिसरात प्रेमसंबंधांच्या वादातून २३ वर्षीय तरुणाची प्रेयसीच्या आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी बेदम मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात पाच महिलांसह एका पुरुषाला अटक केली असून चार आरोपी अद्याप फरार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नागेश जाधव (वय २३) हा शिवाजीनगरमधील वडारवाडी परिसरातील रहिवासी […]

अधिक वाचा..

सहावीच्या मुलीवर ॲसिड हल्ला; कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

मुंबई: विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील महिला व बालिकांवरील वाढत्या अत्याचारांवर तीव्र नाराजी व्यक्त करत संगमनेरमधील सहावीतील विद्यार्थिनीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. या धक्कादायक घटनेमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थगन प्रस्तावाद्वारे बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, इतकी भीषण घटना घडूनही आरोपी अजूनही मोकाट कसा आहे? पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक उरला आहे का? […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

Video! शिरूर तालुका हादरला! चिमुकल्याचा संशयास्पद मृत्यू; घटनाही अगदी तशीच…

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील दहिवडी गावातील मांजरे वस्ती येथे साई मांजरे या सहावीत शिकणाऱ्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर मृत्यू हा हत्या आहे की घातपात हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मुलाच्या डोक्यावर खोल जखम आढळून आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दीड वर्षांपूर्वी तशीच घटना […]

अधिक वाचा..

रिॲलिटी शोच्या नावाखाली ५० लाखांचा व्यवहार; सेवानिवृत्त एचओडीची गोळी झाडून हत्या, तिघांना अटक

छत्रपती संभाजीनगर: रिॲलिटी शो सुरू करण्याच्या नावाखाली ५० लाख रुपये घेतलेल्या तरुणांनी पैशांच्या वादातून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त विभागप्रमुखाची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास करत तिघा आरोपींना अटक केली आहे. राजाभाऊ सुभराव लोंढे (वय ६०, रा. ज्योतीनगर, उस्मानपुरा) असे मृताचे नाव आहे. तर विशाल विकास राठोड […]

अधिक वाचा..

दहिसरमध्ये भीषण अपघात; ट्रकच्या चाकाखाली स्कूटरस्वाराचा जागीच मृत्यु

मुंबई: मुंबईच्या रस्त्यांवरील वाढती वाहतूक आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच दहिसर पूर्व परिसरात एक अत्यंत धक्कादायक अपघात घडला असून अज्ञात वाहनाने चिरडल्याने एका स्कूटरस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर पूर्व येथील चौकीजवळ दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. स्कूटरवरून जात असलेला एक व्यक्ती अचानक तोल जाऊन रस्त्यावर पडला. त्याचवेळी मागून […]

अधिक वाचा..

कला केंद्राच्या आड सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; २५ तरुणींची सुटका, उपसरपंच बर्गे प्रकरणातील नर्तिका अटकेत

माढा: मोडनिंब येथील पोलीस स्टेशनपासून अवघ्या काही मीटर अंतरावर सुरू असलेल्या ‘स्वरांजली कला केंद्र’च्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. टेंभुर्णी पोलिसांनी १५ मार्च रोजी छापा टाकून तब्बल २५ तरुणींची सुटका केली असून एका महिलेसह पाच जणांवर मानवी तस्करी आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सर्वात […]

अधिक वाचा..