…अन्यथा शिरुर तालक्याचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही

शिरूरमध्ये जुन्या वादातून गोळीबार, चाकण नंतर शिरुर मध्ये पिस्तुलाची दहशत शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील सरदार पेठेत जुन्या रागातून कृष्णा वैभव जोशी या आरोपीने इन्कमटॅक्सला चार वर्षापूर्वी अर्ज केल्याचा गैरसमजातून महेंद्र मोतीलाल बोरा यांना शिवीगाळ करत पिस्तुल काढुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने महेंद्र यांच्या छातीवर रोखुन ” तुला आज जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देवुन […]

अधिक वाचा..

शिरूर शहरात मेणबत्ती मोर्चा काढून देशमुख, सूर्यवंशी हत्तेचा निषेध

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात मेणबत्ती मोर्चा काढून व हुतात्मा स्मारकाला पुष्प हार घालून, संतोष देशमुख व सोमनाथ सुर्यवंशी यांना सकल मराठ समाज व सर्व धर्मीय, सर्व पक्षीय, सामाजिक संघटना या सर्व संघटनांनी सामुहीक आदरांजली वाहिली. शिरुचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी मेणबत्ती हातात धरून निषेध नोंदवण्यात आला. या […]

अधिक वाचा..

नागपुरात समुपदेशनाच्या नावाखाली डॉक्टरकडून महिलांवर अत्याचार

कठोर कारवाई करण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश नागपूर: नागपूर शहर हद्दीमध्ये हुडकेश्वर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील समुपदेशक डॉक्टरने मागील नऊ-दहा वर्ष करिअर कौन्सिलिंग व इतर समुपदेशनाच्या नावाखाली अकरावी-बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ४ जानेवारी २०२५ रोजी एका महिलेने तक्रार दाखल केल्याने सदर घटना उघडकीस आली असून अकरावी बारावीच्या […]

अधिक वाचा..

सैफ अली खानवरील हल्ला राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा: नाना पटोले

मुंबई: पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता सैफ अली खान यांच्यावर झालेला खुनी हल्ला महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा आहे. मुंबईतील वांद्रे या वर्दळीच्या भागात अशा घटना होत असतील तर मुंबईत कोण सुरक्षित आहे? मुंबई, पुणे, बीड, परभणी, नागपूरमधील वाढत्या गुन्हेगारी घटना पाहता राज्यात गृहमंत्री आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजपा युती […]

अधिक वाचा..
shikrapur-chakan-road-accid

अपघाताचा थरार! शिक्रापूर-चाकण रस्त्यावर कंटेनरने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं…

शिक्रापूर: शिक्रापूर-चाकण रस्त्यावर भरधाव मालवाहतूक कंटेनरने दहा ते बारा गाड्यांना जोरात धडक दिली आहे. अपघातात अनेक जण जखमी झाले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. चाकणमधील माणिक चौकात कंटेनर चालकाने तीन महिलांना उडवले. कंटेनरसह पळून जाण्याच्या प्रयत्नात चालक भरधाव वेगात निघाला होता. त्या भीतीपोटी तो सुसाट वेगाने पळ काढू लागला. काही अंतरावर त्याने एका मुलीच्या […]

अधिक वाचा..

संभाजीनगरमध्ये रात्रीच्या अंधारात हातात कोयता घेऊन येतात अन्…

मुंबई: छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी भागात कोयता गँगने दहशत निर्माण केली आहे. दुकाने फोडण्याचे प्रकार, चोरी, आणि विनाकारण नुकसान करून गॅंगने व्यापाऱ्यांचे जीवन उध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. रात्रीच्या अंधारात दुकाने फोडण्याचे प्रकार गेल्या दोन दिवसांपासून बजाजनगर भागात गॅंगने हातात कोयता घेऊन 8-9 दुकाने फोडली. 1) काही दुकानांमधून माल […]

अधिक वाचा..
shirur-police

शिरूरमध्ये वृद्ध महिलेच्या गळ्याला तलवार लावून लुटणाऱ्याला शिरूर पोलिसांनी केले जेरबंद…

शिरूर (अरूणकुमार मोटे) : शिरूर शहरातील स्टेट बँक कॉलनी येथे ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्याला तलवार लावून गळ्यातील पोत हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला शिरूर पोलिस स्टेशनच्या पथकाने जेरबंद केले आहे, अशी माहिती शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली. आरोपीने हा गुन्हा दोन अल्पवयीन मुलांच्या साथीने केल्याची कबुली दिली आहे. शिरूर पोलिसांच्या […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘सैराट’ची पुनरावृत्ती, भावानेच बहिणीला संपवल…

छत्रपती संभाजीनगरमध्ये मनाला हादरवणारी एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. 17 वर्षीय नम्रता शेरकर हिची 200 फूट उंच डोंगरावरून ढकलून हत्या करण्यात आली आहे. ही क्रूर घटना तिच्या चुलत भावानेच केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. घटनेचा तपशील प्रेम प्रकरणातून रागाचा स्फोट नम्रता एका तरुणावर प्रेम करत होती, मात्र कुटुंबाला तिचं प्रेमसंबंध मान्य नव्हतं. कुटुंबातील […]

अधिक वाचा..

त्या महिलेवर सामूहिक अत्याचार केलेल्या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करावी

पीडित महिलेचे व कुटुंबाचे समुपदेशन करण्यात यावे; डॉ. नीलम गोऱ्हे परभणी: परभणी येथे (दिनांक ३) जानेवारीच्या पहाटे चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकला. यावेळी अतिशय भयानक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. तिथे वास्तव्यास असलेल्या कुटुंबातील एका शेतमजूर महिलेवर काही नराधमांनी सामूहिक अत्याचार केला. यावेळी धारदार शस्त्राने हल्ला केल्याने कुटुंबातील तीन सदस्य जखमी झाले असून एकाची प्रकृती […]

अधिक वाचा..

उल्हासनगरातील भूमाफियांची चौकशी क्राईम ब्रांचकडे

खंडणीचा खोटा गुन्हा बुमरॅंग होणार मुंबई: उल्हासनगरातील टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीची व हितसंबंधितांविरोधात कारवाईची मागणी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आता घोटाळेबाजांवरच बुमरॅंग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मागील महिन्यांत २८ तारखेला हिललाईन पोलिस स्थानकात १ कोटी रुपयांची खंडणी मागत ५ लाख खंडणी घेतल्याबाबतचा खोटा गुन्हा कोणतेही पुरावे नसतांनाही […]

अधिक वाचा..